Jalgaon News : ‘बिग बटरफ्लाय मंथ’ सप्टेंबर २०२३च्या औचित्याने निसर्गमित्र जळगाव आयोजित ऑनलाईन फुलपाखरु प्रश्नमंजुषा उपक्रमात ११०५ फुलपाखरू प्रेमींनी सहभागी होऊन त्यास भरभरून प्रतिसाद दिला. (Response from across state to Butterfly Quiz Over eleven hundred wildlife enthusiasts participated Jalgaon News)
या उपक्रमात महाराष्ट्रासोबतच गोवा, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, हैद्राबाद, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, ओडीशा या राज्यांमधील विविध वयोगटातील वन्यप्रेमी सहभागी झाले होते. भारतात ५ सप्टेंबर २०२० पासून सप्टेंबर महिना ‘बिग बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा करण्यात येतो.
फुलपाखरे ‘बायो इंडिकेटर’
फुलपाखरे ही उत्तम ‘बायो इंडिकेटर’ समजली जातात. त्यामुळे त्यांचे जतन व संवर्धन होणे ही तातडीची गरज आहे. त्यासाठी प्रथम फुलपाखरांचे जीवनचक्र समजून घेणे गरजेचे आहे.
यासाठी निसर्गमित्र जळगावतर्फे १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन फुलपाखरू प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले.
या शहरांमधून सहभाग
निसर्गमित्र जळगावच्या महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन प्रश्नमंजुषा उपक्रमात जळगावसह जिल्ह्यातील भुसावळ, यावल, रावेर, एरंडोल, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, तसेच धुळे, साक्री, नंदुरबार, नवापूर, शहादा, नाशिक, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, हिंगोली, अमरावती, दर्यापूर, वर्धा, वाशीम, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अंबेजोगाई, लातूर, परभणी, अहमदनगर, पुणे, भोर, सोलापूर, बार्शी, तुळजापूर, बारामती,
सांगली, मिरज, सातारा, वाई, कराड, कोल्हापूर, राधानगरी, इचलकरंजी, गडहिंग्लज, पेठवडगाव, इस्लामपूर, रायगड, मुंबई, भांडूप, बोरीवली, बांद्रा, नवी मुंबई, ठाणे, पालघर, तारापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाड, वेंगुर्ले, देवरुख, चिपळूण, डोंबिवली, अंबरनाथमधील नागरिक सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.