Jalgaon Corporator Protest : रस्त्यांवर पडलेले खड्डे, कचरा साफ न होणे, पावसाचे पाणी रस्त्यात साचणे या विविध समस्येमुळे जळगावकर नागरिक त्रस्त आहेत.
प्रशासनाने कामे त्वरीत करावी या मागणीसाठी भाजप नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी महापालिका कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. त्याला महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. (Response of all party councillor to Dr Ashwin Sonawane chain fast protest jalgaon news)
दुपारी एक वाजेपासून डॉ. सोनवणे यांनी नगरसेवक धीरज सोनवणे यांच्यासह महापालिका इमारतीसमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला. त्यांच्या उपोषणाला महापालिकेतील शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, एमआयएमच्या नगरसेवकांनीही पाठींबा दिला आहे. तसेच शहरातील नागरिकांनीही या उपोषणास पाठींबा दिला आहे.
या समस्यांवर आंदोलन
जळगाव शहरात गेल्या अनेक रस्त्यावरील खड्डयांची गंभीर समस्या आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खडडयांच्या कामासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध आहे. मात्र शहरातील रस्त्त्याच्या दुरूस्तीची कामेच होत नसल्याचे दिसून येत आहे.
तसेच शहरातील कचरा काढण्यासाठी मक्ता देण्यात आला आहे. परंतु मक्तेदार त्या कराराप्रमाणे कचरा साफ करीत नाही, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. विविध भागात आजही रस्त्यावर कचरा साचण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे नागरिकांना रोगराईलाही सामोरे जावे लागत आहे.
रस्त्यारस्त्यावर पाणी
शहरातील रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे. पाऊस पडल्यानंतर शहरातील अनेक सखल भाग जलमय होत असतात. मात्र त्याच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाहने काढावी लागत आहे. अशा स्थितीत त्यांना मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याबाबत महापालिका कोणतीही उपाययोजना करीत नसल्याबाबतही नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिका प्रशासन ढिम्म
महापालिका प्रशासन अत्यंत ढिम्म असल्याचा आरोपही अश्विन सोनवणेंसह सर्व पक्षातील नगरसेवकांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे, कि महासभेत आम्ही प्रश्न मांडतो त्यावेळी प्रशासनातील अधिकारी उत्तर देतांना परंतु त्यानंतर प्रत्यक्ष कोणतीही कारवाई मात्र केली जात नाही. प्रश्न जशाचा तसा राहतो, पुढच्या महासभेच्यावेळीही हेच उत्तर दिले जाते. महापालिकेचे अधिकारी वेळकाढू पणा करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रशासनाला जाग आणण्यासाठी उपोषण
महापालिका आयुक्तासह प्रशासनाचे अधिकारी झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला आहे. त्यांना जाग आणण्यासाठीच हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी शहरातील कामे करण्याबाबत ठोस आश्वासन दिल्यानंतरच उपोषण मागे घेण्यात येईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
साखळी उपोषणाप्रसंगी भाजपचे महापालिकेतील गटनेते राजेंद्र घुगे पाटील, विरोधी पक्षनेते व शिवसेना ठाकरे गटाचे सुनील महाजन, शिवसेना शिंदे गटाचे नेते ॲड. दिलीप पोकळे, भाजपचे नगरसेवक विशाल त्रिपाठी, भाजपा महानगराध्यक्ष उज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, ॲड.शुचिता हाडा, भाजपचे सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"पंतप्रधान स्वच्छता अभियानातून शहराला तब्बल ७५ कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. परंतु स्वच्छतेचे कोणतेही नियोजन नाही, शहरात कचरा जैसे थे दिसत आहे. महापालिका आयुक्त त्याबाबत लक्ष देत नाही. त्यामुळे स्वच्छतेचा निधी हा वाया गेल्याचे दिसत आहे. जोपर्यंत शहर समस्या मुक्त करण्याची ग्वाही दिली जात नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहिल." - डॉ. अश्विन सोनवणे नगरसेवक, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.