Jalgaon News : येथील गोडगाव (ता. भडगाव) येथील शिवारात अवैध मुरूम उत्खनन सुरू असताना त्यासाठी महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी आढळून आले.
परंतु ही वाहने जप्त न करता सोडून दिल्याचा प्रकार शनिवारी (ता. २९) घडला. यामुळे महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद दिसून येत असून चौकशीची मागणी होत आहे. (revenue administration left vehicles carrying illegal murum without action jalgaon news)
गोंडगाव (ता. भडगाव) येथील एका शासकीय गटातून अवैध मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला कळविण्यात आली असता महसूल विभागाचे राजेंद्र अहिरे व काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांना या ठिकाणी मुरूम उत्खनन करताना जेसीबी व ट्रॅक्टर वाहने आढळून आली होती.
परंतु फक्त या वेळी महसूलच्या अधिकाऱ्यांनी फक्त पंचनामा करून वाहने सोडून दिल्याचे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकां समोर हा प्रकार घडल्यामुळे सदरची वाहने का सोडली? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात
कजगाव व गोडगाव परिसरात अवैध मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या भागातील तक्रारींमुळे महसूल प्रशासनाने कडक भूमिका घेत या भागात कारवाई सत्र सुरू केले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यामुळे अनेक दिवसांपासून या ठिकाणी उत्खनन थांबले होते.
परंतु या भागात आता दोन दिवसांपासून बाहेरगावातील लोकांनी अवैध मुरूम उत्खनन सुरू केले होते. याबाबत महसूलच्या प्रमुख अधिकाऱ्यांना कळवून देखील कारवाई होत नव्हती, तसेच शनिवारी प्रत्यक्ष उत्खनन करताना वाहने आढळून आल्यानंतरही सोडून देण्यात आल्यामुळे महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
चौकशी करून कारवाई : तहसीलदार हिवाळे
गोंडगाव शिवारातील अवैध मुरूम उत्खननाबाबत तहसीलदार हिवाळे यांना विचारले असता शासकीय कामासाठी वाहतूक सुरू असल्याचे सांगत चौकशी करून वाहनांवर कारवाई करू, असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.