Jalgaon: जीव वाचविण्यासाठी गाडीत लपून बसलो...! RDC असल्याचे सांगितल्यावरही मारहाण; कासार यांनी मांडली आपबिती

मी ‘आरडीसी’ असल्याचे सांगतले, तरीही हल्लेखोरांना मारहाण केली व पळून गेले, अशी आपबिती निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) सोपान कासार यांनी मांडली.
While giving a statement to Collector Ayush Prasad, Superintendent of Police Maheshwar Reddy, Tehsildar Association President Suchita Chavan etc.
While giving a statement to Collector Ayush Prasad, Superintendent of Police Maheshwar Reddy, Tehsildar Association President Suchita Chavan etc.esakal
Updated on

जळगाव : रात्री साडे अकराच्या सुमारास मी वाळूने भरलेले दोन डंपर पकडले. एक डंपर तहसिलदारांना कचेरीत नेण्यास सांगीतले. दुसरेही नेणार असताना दहा ते बारा जण माझ्या अंगावर चालून आले.

त्यांनी दुसरे डंपर पळवून नेत आमच्या गाडीवर हल्ला केला. मी गाडीत लपून बसलो असताना मला बाहेर ओढून लोखंडी रॉडने, काठ्यांनी मारहाण केली.

मी ‘आरडीसी’ असल्याचे सांगतले, तरीही हल्लेखोरांना मारहाण केली व पळून गेले, अशी आपबिती निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) सोपान कासार यांनी मांडली. (revenue divisional commissioner sopan Kasar statement about sand mafia attack Jalgaon news)

श्री. कासार यांच्यावर रात्री हल्लाझाल्यानंतर त्यांना तहसिलदार विजय बनसोडे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्रभर जिल्हा रूग्णालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक सीएमव्ही रेड्डी, महसूल अधिकाऱ्यांनी धाव घेतली. आज सकाळी त्यांना खासगी न्यूक्लीअस रूग्णालयात दाखल करण्यात आले.

श्री. कासार यांनी सांगितले की, काल रात्री साडे अकराच्या सुमारास भुसावळ रोडने जात असताना वाळूचे डंपर (एमएच- १९१९) असल्याची खात्री पटल्याने. तहसिलदार बनसोडेंना तहसिल कचेरीत नेण्यास सांगताना, आणखी एक विनाक्रमांकाचे डंपर आले.

ते न थांबता जात असताना, त्याला माझ्या ड्रायव्हरला पकडण्यास सांगीतले. ड्रायव्हरने ते पकडून आणतानच्या दरम्यान काही जण माझ्या गाडीकडे येतान दिसले. त्यांचे सर्वांचे फोटो मी मोबाईलमध्ये काढले.

काही विचारायच्या आत त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या. मी गाडीत लपून बसलो. त्यांनी मला बाहेर काढत लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. मी आरडीसी’असे सांगितल्यावरही ते एकण्याच्या स्थितीत नव्हते.

ते गेल्यानंतर मी कसेबसे सावरत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांचा मला काही कामासाठी फोन आला असता त्यांना मी मारहाणीची घटना सांगीतली. त्यांनी पोलिसांना पाठवितो असे सांगीतले, तेही आले.

While giving a statement to Collector Ayush Prasad, Superintendent of Police Maheshwar Reddy, Tehsildar Association President Suchita Chavan etc.
Jalgaon Crime: धक्कादायक! उपजिल्‍हाधिकाऱ्यावरच प्राणघातक हल्ला; वाळू माफियांची वाढली मुजोरी

"निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला झाल्याची घटना निषेधार्ह आहे. वाळू माफीयांचे हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहे. लवकरच पोलिस विभाग व मी बसून अशा हल्ले करणाऱ्यांवर ‘मोक्का’ लावण्यासाठीचे पाउले उचलणार आहोत."

- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.

"निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला झाल्याचा मी निषेध करतो. रात्रीच्या वेळी त्यांनी मारहाण करणाऱ्यांना स्वताच्या पदाची ओळख दिली. तरी संशयितांना मारहाण केली. जिल्हाधिकारी व पोलिस विभागाची लवकरच बैठक होवून संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल."- अंकूश पिनाटे, अप्पर जिल्हाधिकारी.

महसूल संघटनातर्फे निषेध

निवासी उपजिल्हाधिकारी कासार यांच्यावरील हल्ल्याचा उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी प्रसाद यांना निवेदन देत निषेध करण्यात आला.

संघटनेच्या अध्यक्षा तहसिलदार सुचिता चव्हाण, तहसिलदार मोहनमाला नाझीरकर, तहसिलदार शितल राजपूत, महेंद्र सूर्यवंशी, डी.एस.भालेराव आदी उपस्थित होते.

जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश नन्नवरे यांनी श्री.कासार यांच्यावरील हल्लाचा निषेध नोंदविला आहे. रात्री आरडीसी’नीं त्यांची ओळख दिल्यावरही संशयितांना मारहाण केल्याचा प्रकार निंदनीय आहे. शासनाने अशा हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

While giving a statement to Collector Ayush Prasad, Superintendent of Police Maheshwar Reddy, Tehsildar Association President Suchita Chavan etc.
Nashik News : पथक आले रे...आकडे सांभाळा; वीज वितरण कंपनीकडून वीजचोरांवर छापा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.