Jalgaon Revenue Week : जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताह; जाणून घ्या संपूर्ण आठवड्याचे नियोजन

Jalgaon District Collector Ayush Prasad
Jalgaon District Collector Ayush Prasad esakal
Updated on

Jalgaon Revenue Week : महसूल विभागामार्फत जिल्ह्यात १ ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्याबरोबरच १ ते ७ ऑगस्टदरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

महसूल दिनी मंगळवारी (ता. १) जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे आदी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.(Revenue week will be celebrated in district from today jalgaon news)

बुधवारी (ता. २) ‘युवा संवाद’ उपक्रमात जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तत्काळ निर्गमित करण्यासाठी महाविद्यालयनिहाय शिबिर घेण्यात येणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाणार आहे‌.

अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्रवाटप कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारी (ता. ३) ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी व नागरिकांना मदतनिधीचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागात महसूल अदालतीचे आयोजन केले जाणार आहे.

४ ऑगस्टला ‘जनसंवाद’ उपक्रमात महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. सलोखा योजनेत गावागावांतील शेत रस्त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येणार आहे. आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon District Collector Ayush Prasad
Girish Mahajan News : आधी मुक्ताईनगर खिशात; ..आता राहिले तरी काय? गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना टोला

‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या ५ ऑगस्टच्या उपक्रमात भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या व शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या महसूलविषयक अर्ज तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे.

६ ऑगस्टला महसूल संवर्गातील जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी ‘महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ७ ऑगस्टला महसूल सप्ताहादरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेण्यासाठी ‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ होणार आहे.

याशिवाय जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्प डेस्क, हेल्पलाईन तयार करून मदत करण्यासाठी यंत्रणा कक्ष करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहादरम्यान शासनाचे महत्त्वाचे कायदे, विकास योजना, उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करून नागरिकांना देण्यात येणार आहेत. महसूल सप्ताहात महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. प्रसाद यांनी केले आहे.

Jalgaon District Collector Ayush Prasad
Jalgaon News : खडके येथील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द; 3 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.