Jalgaon News : जिल्ह्यात Mockdrill द्वारे कोरोना सुविधांचा आढावा

Corona News
Corona Newsesakal
Updated on

जळगाव : चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने काय तयारी केली आहे, याचा ‘मॉकड्रिल’ मंगळवारी (ता. २७) देशभरात घेण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील सज्जता, तयारीची माहिती दिली.

नुकतीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट, सिलिंडर यांची तपासणी करून तयार ठेवावेत.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Corona News
Nashik News : अवघ्या 13 वर्षाच्या ओम ने केली 3800 कि.मी.ची नर्मदा परिक्रमा सायकलवर पूर्ण

जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कोरोना कक्ष सुरू करावा यांसह कोरोना रुग्णांवर उपचारासाठीची औषधे, स्टाफची नियुक्ती करावी, जिल्ह्यात रुग्ण वाढले, तर त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी यंत्रणेने सज्ज असले पाहिजे, अशा सूचना दिल्या होत्या. मंगळवारी जिल्हास्तरावर ‘मॉकड्रिल’ घेण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार डॉ. पाटील यांनी तालुका व ग्रामीण भागात सुविधांची माहिती घेऊन ती सादर केली.

71 हॉस्पिटल

जिल्ह्यात ७१ ठिकाणी हॉस्पिटल आहेत. त्यात शासकीय १७, खासगी ५४ आहेत. कोरोना रुग्णांसाठी एकूण पाच हजार ७५३ बेड तयार करण्यात आले आहेत. त्यात आयसोलेशन, ऑक्सिजन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडचा सामावेश आहे.

८७६ डॉक्टर असून, ११०२ नर्सेस आहेत. ८६ ठिकाणी रुग्णवाहिका आहेत. आरटीपीसीआर किट ६ हजार ९३५ आहे. २२ हजार २५७ पीपीई किट आहेत. नेब्युलायझर २९६ आहेत. ऑक्सिमीटर ६३० आहेत. ऑक्सिजन कान्सेंट्रेटर ४३६, ऑक्सिजन सिलिंडर २३४८ आहेत. ऑक्सिजन निर्माण करणारे १७ प्लांट, एलएमओ प्लांट २२ व गॅस पाइपलाइन ६७ ठिकाणी आहे.

Corona News
Nashik News:...अन् दुकानावर नायलॉन मांजा बंदीचे फलक झळकले! विक्रेत्यांवर तिसरा डोळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.