जळगाव : येथील जिल्हा शासकीय (Govt) वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या (जीएमसी) इमारत बांधकामासाठी ७११ कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांच्या सुधारित खर्चास सोमवारी (ता. २७)
झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. (Revised administrative approval for building Medical College Hospital Capacity now 150 jalgaon news)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. या निर्णयामुळे आतापर्यंत १०० विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश दिला जात होता. मात्र यापुढे १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय २०१८-१९ ला सुरू झाले. पहिल्या वर्षापासून ‘एमबीबीएस’ला शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.
यंदा सध्या शंभर विद्यार्थ्यांच्या बॅचची परीक्षा सुरू आहे. दोन महिन्यांत त्या बॅचचे १०० विद्यार्थी एमबीबीएस होऊन बाहेर पडतील. यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात पाचव्या बॅचने प्रवेश घेतला आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
आगामी शैक्षणिक वर्षापासून १५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पूर्वी ५०० खाटांचे रुग्णालय मंजूर होते. आता खाटांची संख्या ६५० करण्यात आली आहे. सोबतच ५० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमताही वाढविण्यात आली आहे. लवकरच महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू होणार आहे.
"वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ७११ कोटींची सुधारित मान्यता मिळाली आहे. सोबतच येथे ६५० खाटांचे रुग्णालय व १५० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५० करण्यात आली आहे, ही चांगली गोष्ट आहे."-डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, जीएमसी, जळगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.