जळगाव : काव्यरत्नावली चौक ते गाडगेबाबा चौकापर्यंतच्या रस्त्याबाबत (road construction) नगरसेवकांनी ‘रस्त्याचे काम लवकरच सुरू होतेय. (road construction work on From Kavyaratnavali to Gadge Baba Chowk is still stopped jalgaon news)
अमृत योजनेंतर्गत कनेक्शन लवकर घ्यावेत’, असे आवाहन करणारे फलक दोन महिन्यांपासून लावून ठेवले आहेत, पण नागरिकांनी कनेक्शन घेणे तर दूरच, महापालिकेचीच या रस्त्यावरील खोदकामे वारंवार निघत असल्याने या खोदकामांचा मुख्य ‘खोडा’ रस्त्याच्या कामात घातला जात आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाला मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न हजारो नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून काव्यरत्नावली चौक ते थेट महाबळ-संभाजीनगर व पुढे गाडगेबाबा चौकापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चालण्यायोग्यही हा रस्ता राहिलेला नसताना वाहन चालविणे तर आणखीच कठीण. खड्ड्यांमुळे रस्त्यांची व परिणामी वाहनधारकांच्या सांधे- मणक्यांचीही चाळण होईल, इतका हा रस्ता खराब आहे. मात्र, महापालिकेसह या रस्त्याचे काम करणारी एजन्सी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग या सुसत यंत्रणांना त्याच्याशी काही देणेघेणे नाही.
वाढीव, विस्तारित वस्ती काव्यरत्नावली चौकापासून सुरवात केली, तर डाव्या बाजूला आरटीओ कार्यालयामागील परिसर, आदर्शनगर, उजवीकडे टेलिफोनगर, श्रद्धा कॉलनीकडे जाणारा रस्ता. पुढे मायादेवीनगर, विद्युतनगरी, शारदा कॉलनी, महाबळ, बँक ऑफ महाराष्ट्र कॉलनी, अनुराग स्टेट बँक कॉलनी,
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
मकरंदनगर, पारिजात कॉलनी, नागेश्वर कॉलनी, समतानगर, देवेंद्रनगर, विवेक कॉलनी, नूतन वर्षा कॉलनी, मोहननगर, पुढे साखरेवाडी, संभाजीनगर, गाडगेबाबा चौक परिसर, रायसोनीनगर, झाकीर हुसेन कॉलनी, मोहाडी रोडवरील नेहरुनगर असा विस्तीर्ण परिसर या भागात आहे.
लाखावर लोकसंख्या
या संपूर्ण नागरी वस्तीत समतानगरातील तीन हजारांवर झोपडपट्ट्या आणि २० हजारांवर मालमत्तांमध्ये एक लाखाहून अधिक लोकसंख्येचे वास्तव्य या भागात आहे. यापैकी जवळपास ४० हजारांहून अधिक नागरिक याच काव्यरत्नावली चौक ते गाडगेबाबा चौकापर्यंतच्या प्रमुख रस्त्यावरून वापरतात. असे असताना, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम होऊ नये, हे दुर्दैव आहे.
चौकात, रस्त्यावर खोदकाम थांबेना
गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केला असता, काव्यरत्नावली चौकासह या रस्त्यावर ठिकठिकाणी वारंवार खोदकाम करण्यात येत आहे. आधीच अमृत योजनेंतर्गत तीन वेळा हा प्रमुख रस्ता खोदला गेला.
आताही त्याचे खोदकाम थांबलेले नाही. दोन महिन्यांपूर्वी काव्यरत्नावली चौकात ‘अमृत’ योजनेंतर्गत मोठ्या जलवाहिनीचे काम झाले. ते तब्बल दोन महिने चालले. अजूनही या चौकापासून पुढे थेट संभाजीनगरपर्यंत कुठे ना कुठे खोदकाम सुरूच आहे.
नगरसेवकांचे फलक
प्रभाग १२ व १३ चा भाग असलेला हा संपूर्ण रस्ता जवळपास दोन किलोमीटरचा आहे. मात्र, या दोन किलोमीटरच्या टप्प्यात रस्ताच शिल्लक नाही, केवळ खड्डेच आहेत. दोन महिन्यांपासून या मार्गावर दोन्ही प्रभागांतील नगरसेवक नितीन बरडे व अनंत (बंटी) जोशी,
जितेंद्र मराठे यांनी रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने नागरिकांनी अमृतचे कनेक्शन घेण्याबाबत आवाहन करणारे मोठे फलक लावलेत. दोन महिन्यांपासून हे फलक लावून ठेवलेत. तरीही रस्त्याचे काम सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे या रस्त्याचा मुहूर्त कधी लागेल, असा प्रश्न संतप्त नागरिकांमधून उपस्थित होतोय.
रस्त्याच्या कामाचे स्वरूप
रस्ता : काव्यरत्नावली चौक ते गाडगेबाबा चौक
पहिला टप्पा : काव्यरत्नावली ते महाबळ (८०० मीटर)
अपेक्षित खर्च : ८५ लाख
दुसरा टप्पा : महाबळ ते देवेंद्रनगर (९५० मीटर)
अपेक्षित खर्च : ८५ लाख
कामाचे स्वरूप : डांबरीकरण
काम करणारी यंत्रणा : सार्वजनिक बांधकाम विभाग
कंत्राटदार : श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर
"या कामाचे कार्यादेश कधीचेच देण्यात आले आहेत. मात्र, रस्त्यावर ठिकठिकाणी अमृत योजनेची कामे सुरू असल्याने खोदकाम होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू होऊ शकत नाही. त्याचा पाठपुरावा सुरू असून, दोन-तीन दिवसांत काम सुरू होईल." -जितेंद्र मराठे, नगरसेवक
"या रस्त्यावर काही महिन्यांपासून वारंवार खोदकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू करता येत नाही. शुक्रवारी रस्त्याची स्वच्छता करून काम सुरू करायचे होते, त्यासाठी यंत्रणा तयार होती. मात्र, आजही दोन- तीन ठिकाणी महापालिकेने खोदकाम सुरू केले. त्यामुळे आमचे काम थांबले." -आदित्य खटोड, श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.