Jalgaon : मनपास संभाजी चौकापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीचे वावडे

Potholes on road from Kavyaratnavali Chowk to Sambhaji Chowk
Potholes on road from Kavyaratnavali Chowk to Sambhaji Chowkesakal
Updated on

जळगाव : गेल्याच आठवड्यात आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौकापर्यंतच्या रस्त्यातील खड्डे पॅचवर्कने बुजविण्यात आले. मात्र, वर्षानुवर्षे खड्ड्यात गेलेल्या काव्यरत्नावली ते संभाजी चौकापर्यंतच्या रस्त्याकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाने ढुंकूनही पाहिले नाही. प्रभाग १२ व १३ शी संबंधित नगरसेवकही त्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.

जळगाव शहरातील सर्वाधिक सुंदर, आकर्षक व वैभव असलेला चौक म्हणून काव्यरत्नावली चौक प्रसिद्ध आहे. अर्थात, त्याचे श्रेय महापालिकेचे नव्हे, तर तो चौक विकसित करणाऱ्या जैन इरिगेशनचे आहे. शिवाय या चौकाचा चौफेर परिसर ‘व्हीआयपी’ म्हणूनही ओळखला जातो. कारण या परिसरात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद सीईओ, जिल्हा शल्यचिकित्सक, अपर जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी, राजकीय पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे हा परिसर नेहमीच चकाचक ठेवला जातो. (Road repair works Pending up to Sambhaji Chowk from Municipal Corporation Jalgaon News)

Potholes on road from Kavyaratnavali Chowk to Sambhaji Chowk
Jalgaon Crime Update : Beauty Parlor संचालिकेस message टाकणे भोवले

चौकापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती

असे असूनही गेल्या काही वर्षांपासून आकाशवाणी ते काव्यरत्नावली चौकापर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. खोदलेल्या चाऱ्या बुजल्या नव्हत्या. रस्त्यातील खड्डे तसेच होते. मात्र, गेल्या आठवड्यात या रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील खड्डे डांबरी पॅचवर्कने बुजविण्यात आले. खोदलेल्या चाऱ्यांच्या ठिकाणीही पॅचवर्क करण्यात आले.

पुढचा रस्ता तसाच खड्ड्यात

आकाशवाणी ते काव्यरत्नावली चौकापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करत येणारी यंत्रणा या चौकाच्या पुढे मात्र सरकली नाही. या चौकाच्या तिन्ही बाजूंकडील मार्ग अत्यंत खराब झाले आहेत. काव्यरत्नावली चौक ते महाबळ बसथांब्यापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. महाबळ चौक ते संभाजी चौकापर्यंतच्या रस्त्याची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. शेतरस्त्यापेक्षाही दुरवस्था झालेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे नाहीत, तर संपूर्ण रस्ताच खड्ड्यात आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे तर दूरच चालणेही कठीण जावे, अशी त्याची अवस्था आहे. असे असताना संभाजी चौकापर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्याची बुद्धी मनपा यंत्रणेला झालेली नाही.

Potholes on road from Kavyaratnavali Chowk to Sambhaji Chowk
Jalgaon : बालिका अत्याचारात 20 वर्षांचा कारावास; पोक्सो न्यायालयाचा निकाल

नगरसेवक उदासीन

विशेष म्हणजे हा रस्ता ज्या प्रभाग १२ व १३ मधून मार्गस्थ होतो, त्या प्रभागातील नगरसेवकांचे याच रस्त्यावरून येणे- जाणे सुरू असते. तरीही त्यांचे त्याकडे दुर्लक्ष झालेय. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत नगरसेवकही उदासीन आहे याच काव्यरत्नावली चौकातून डी- मार्टकडे व रामानंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. त्यांच्या दुरुस्तीचेही नियोजन दिसत नाही.

"काव्यरत्नावली चौक ते महाबळ स्टॉपपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही प्रस्तावित आहे. पुढील आठवड्यापर्यंत ते सुरू होईल."

-नितीन बरडे, नगरसेवक, प्रभाग १२

Potholes on road from Kavyaratnavali Chowk to Sambhaji Chowk
Jalgaon Crime News : पिंप्राळा हुडकोत चॉपर हल्ल्यात तरुण जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.