Jalgaon News : शहरातील 83 कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी : आमदार भोळे

Road Construction
Road Constructionesakal
Updated on

Jalgaon News : शहरातील रस्त्यांच्या ८३ कोटींच्या कामांच्या निविदांना शासनाने मंजुरी दिली आहे. नाशिक येथून लवकरच आदेश येतील आता ही कामे तातडीने सुरू करा असे निर्देश आमदार सुरेश भोळे यांनी आयुक्तासोबत झालेल्या बैठकीत दिले. (Road works worth 83 crore approved in city jalgaon news)

सोमवारी (ता.१६) सायंकाळी आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. यावेळी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, राजेंद्र घुगे पाटील, उपस्थित होते.

आमदार भोळे यांनी सांगितले, की शहारातील रस्ते कामांच्या निविदांना मंत्रालयातून मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक विभागीय कार्यालयात आदेश आले आहेत.

Road Construction
Jalgaon News : जळगावची वाटचाल कुपोषणमुक्तीकडे : जिल्हाधिकारी प्रसाद

मंगळवारी (ता.१७) हे आदेश जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात प्राप्त होतील. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग असो की महापालिकेच्या बांधकाम विभागाचे काम असो ती कामे तातडीने सुरू करण्यात यावे. तसेच काही भागात डागडुजी सुरू करण्यात यावी.

तसेच वॉटरग्रेसच्या सफाईबाबत लक्ष द्यावे, त्यांच्या बाबत काही तक्रारी आहेत त्याची दखल घ्यावी, अमृत योजनेचे पाणी काही भागात येते तर काही भागात येत नाही. त्याबाबत ताबडतोब पाहणी करावी.तांत्रिक कारणाने काही भागात पाणी पुरवठा होत नसेल तर नागरिकांना त्या भागात लाऊड स्पीकरच्या रिक्षा फिरवून माहिती द्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Road Construction
Thalassemia Disease : ‘रेडक्रॉस’कडून 23 हजार 'थॅलसेमिया' ग्रस्तांना जीवनदान! लाखो रक्त पिश्‍व्यांचे संकलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.