Amrut Yojana : नागरिकांचा महापालिकेविरोधात आक्रोश; ‘अमृत’च्या रस्त्याच्या कामास विलंब

Citizens protesting on the streets of Merun area on Wednesday
Citizens protesting on the streets of Merun area on Wednesday esakal
Updated on

जळगाव : मेहरूण भागात ‘अमृत’ योजनेच्या कामासाठी रस्ते खोदले. मात्र, ते अद्यापही बुजविलेले नाहीत. त्यामुळे बुधवारी (ता. ५) नागरिकांनी रस्त्यावर येऊन तीव्र संताप व्यक्त केला. (Roads were dug for work of Amrit scheme However it is still not extinguished in jalgaon news)

मेहरूण भागातील येथील के.जी.एन. डेअरीसमोरील मास्टर कॉलनी परिसरात अमृत योजनेच्या कामासाठी मागील ४० दिवसांपासून रस्ते खोदले आहेत. या रस्त्यांचे काम करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, अद्यापही रस्त्यांची कामे झालेली नाहीत.

होळीनिमित्त कामगार गावाला गेल्यामुळे कामास विलंब होत असल्याचे महापालिकेतर्फे सागंण्यात आले. मात्र, अद्यापही रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. तसेच लहान- मोठे अपघातही होत आहेत. यामुळे संतप्त झालेले नागरिक बुधवारी महापालिकेविरोधात रस्त्यावर उतरले होते. या वेळी त्यांनी लवकर काम पूर्ण झाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Citizens protesting on the streets of Merun area on Wednesday
Jalgaon News : रस्त्याचे काम थांबवा, कॉंक्रिटीकरण करायचेय; ‘अंधेरनगरी चौपट राजा’चा प्रत्यय!

सामजिक कार्यकर्ते सलीम इनामदार, रहीम शेख, शरीफ शेख, युनूस खाटीक, इमरान खान, फिरोज पटेल, युसूफ खाटीक, इशाक पिंजारी, बबलू, फैजन, दानिश काकर, वसीम पटवे, मुजामिल खातिक, फैज खाटीक, रियाज खाटीक, रियाजभाई मौलाना, मुजाहिद आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

Citizens protesting on the streets of Merun area on Wednesday
Jalgaon News : घरातून गेलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()