Jalgaon Crime News : परिसरात दोन दिवसापासून दरोड्याला झालेली सुरवात थांबता थांबत नसून पोलिसांनाच खुले आव्हान चोरट्यांनी दिले आहे. चक्क दुसऱ्या दिवशी देखील कजगाव- चाळीसगाव मार्गावरील भोरटेक येथील पोलिस पाटील व पावरा मजुरास चाकू लावत व मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम लांबवली.
कजगावमध्ये मंगळवारी (ता.२) दोन घरावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकत पाच ते सात लाखाचा ऐवज लुटला. एका घर मालकास जाग आल्याने तेथील दरोडा टळला. (robbery on third day in kajgaon area jalgaon crime news)
या घटनेचा तपास सुरू असतानाच मंगळवारी (ता.३) कजगाव- भडगाव मार्गावरील पासर्डीजवळ साठवर्षीय दिलीप जगताप यांना चाकूने वार करत लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरडीमुळे परिसरातील तरुण धावून आल्याने लूटमार टळली.
या घटनेस चोवीस तास उलटत नाही तोच कजगावपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भोरटेक येथील पोलिस पाटील राजेंद्र महाजन (वय ५८) यांना गावाजवळ काही अंतरावर अज्ञाताने रात्री पावणेनऊच्या सुमारास तुमचा मोबाईल द्या मला एक कॉल करायचा आहे, असं निमित्त करत मोबाईल मागितला.
मात्र महाजन यांनी मोबाइलमध्ये बॅलन्स नसल्याचे सांगत ते शेताकडे जाऊ लागले नी मागून तीन अनोळखी व्यक्तींनी राजेंद्र महाजन यांना चाकू लावत पैसे काढ मोबाईल दे करत दमदाटी करत मोबाईल घेत पोबारा केला.
तेथून दोनशे मीटर अंतरावर भोरटेक गावाजवळ मुख्य रस्त्यावर विनोद पावरा या मजुराला अडवत त्याला मारहाण करत त्याच्या खिशातील पैसे व मोबाईल हिसकावत पोबारा केला. दोनशे मीटर अंतरात दोन जणांना चाकू लावत लुटल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
"गेल्या दोन दिवसांपासून कजगाव परिसरात एका मागून एक घटना घडत गुन्हेगार प्रवृत्ती ने चांगलेच डोकेवर काढत पोलिसांना आव्हानच दिले आहे." -राजेंद्र महाजन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.