NCP Sharad Pawar Group : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ‘आरआरआर’ युवा टीम मैदानात; संवाद यात्रेतून होणार धमाका

rohit patil, rohini khadse, raohit pwar
rohit patil, rohini khadse, raohit pwaresakal
Updated on

NCP Sharad Pawar Group : देशभरात आर. आर. आर. हा चित्रपट सुपरहीट झाला.

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची युवा टीम रोहित पवार, रोहित पाटील व रोहिणी खडसे हे तीन ‘आर’ मैदानात उतरणार असून, आगामी काळात त्यांच्या सभांचा धडाका दिसून येणार आहे. याची सुरवात जळगाव जिल्ह्यातून होणार असून, येत्या रविवारी (ता. ३) आमदार रोहित पवार, रोहीत पाटील संवाद यात्रेच्या निमित्ताने जळगावात येत आहेत. (rohit patil rohini khadse rohit pawar on Samvad Yatra ncp jalgaon news)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते सत्तेच्या दिशेने गेले. त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याचे दिसून आले. ही पोकळी भरून काढण्यासाठी आता युवा टीम पुढे आली आहे. त्यात शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार आक्रमकपणे अग्रेसर असून, ते पक्षातून फुटलेल्या नेत्यांवर सडकून टीका करीत आहेत.

तसेच, आर. आर. पाटील यांचे पूत्र रोहित पाटील हे सुद्धा रणागणात उतरले असून, शरद पवार यांची बाजू ते भक्कमपणे मांडत आहेत. त्यांच्यासोबत आता एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या सुद्धा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी मैदानात उतरतील. त्यांची शरद पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.

रोहिणी खडसे ह्या वडील एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे आक्रमक आहेत. त्यांना राजकारणाचे बाळकडू भारतीय जनता पक्षात घरातून मिळाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

rohit patil, rohini khadse, raohit pwar
Eknath Shinde:विरोधकांच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया! म्हणाले, "२०१४ मध्ये ज्यांनी राहुल गांधीचा विरोध केला..."

जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ त्यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय झाल्या आहेत. जळगांव जिल्ह्यात अनेक आंदोलनांत त्यांनी सहभाग घेतला आहे.

शरद पवार गटाच्या या तिन्ही ‘आरआरआर’ नेत्यांची आजच्या परिस्थितीत खरी कसोटी आहे. रोहित पवार राज्यात फिरत आहेत. त्यांच्या सोबत रोहित पाटील हे सुद्धा आहेत. रविवारपासून ते जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

संवाद यात्रेच्या निमित्ताने ते जिल्ह्यात फिरणार असून, त्यांच्या समवेत महिला आघाडीच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेही संदेश यात्रेत सभांचा धडका करतील. त्यानंतर पाच सप्टेबरला जळगाव येथील सागर पार्क मैदानावर पक्षाचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.

rohit patil, rohini khadse, raohit pwar
Rohini Khadse News : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी ॲड. रोहिणी खडसे; जळगावसह खानदेशला मान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()