भुसावळ रेल्वे विभागात ‘RPF’ ने केली 745 मुलांची सुटका

RPF latest marathi news
RPF latest marathi newsesakal
Updated on

जळगाव : भांडणांमुळे, कौटुंबिक समस्यांमुळे मुले घर सोडून रेल्वेने निघून जातात. पैसे नसले की रेल्वे स्थानकावर बेवारसपणे फिरतात. अशांचा शोध घेऊन (ऑपरेशन नन्हे फरिश्ते) त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत पोचविण्याचे काम रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी गेल्या सहा महिन्यात केले आहे.

तब्बल ७४५ मुलांची ग्लॅमर दुनियेच्या विळख्यातून सोडविण्याची कामगिरी भुसावळ विभागातर्फे करण्यात आली आहे. (RPF rescued 745 children in Bhusawal railway section jalgaon Latest marathi news)

घरगुती भांडण, पालकांनी रागविल्याने किंवा मोठ्या शहराचे आकर्षण असल्याने अनेक मुले आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वे स्थानकावर येतात. अशात ही मुले आरपीएफ जवानांना आढळतात.

हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी जवळीक साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांजवळ पुन्हा एकत्र जाण्याचा सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

त्याशिवाय ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत मुलांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याची जबाबदारीही पार पाडली जात आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने शासकीय रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत गेल्या ६ महिन्यांत म्हणजे जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्मवरील ७४५ मुलांची सुटका केली आहे.

यामध्ये ४९० मुले, २५५ मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.

RPF latest marathi news
Eknath Shinde : राज्यात शिंदे गटाचा 'पहिला सरपंच'; 'या' ग्रामपंचायतीला मिळाला मान

विभागनिहाय सुटका केलेली मुले

भुसावळ विभागात १३८ सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून त्यात ७२ मुले व ६६ मुलींचा समावेश आहे. मुंबई विभागात सर्वाधिक ३८१ सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून त्यात २७० मुले आणि १११ मुलींचा समावेश आहे.

पुणे विभागात १३६ सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून यामध्ये ९८ मुले आणि ३८ मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागात सुटका केलेल्या ५६ मुलांमध्ये ३० मुले आणि २६ मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागात सुटका केलेल्या ३४ मुलांची नोंद झाली असून त्यात २० मुले व १४ मुलींचा समावेश आहे.

गतवर्षी ९७१ जणांची सुटका

गतवर्षी (२०२१) जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफने शासकीय रेल्वे पोलिस इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६०३ मुले, ३६८ मुलींसह ९७१ मुलांची सुटका केली आहे.

RPF latest marathi news
गद्दार गुलाबरावांचा स्मृतिभ्रंश झाला : संजय सावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.