जळगाव : ‘सडक सुरक्षा- जीवन रक्षा’ यानुसार वाहन चालविताना सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवावे. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरावे. दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी दुचाकी प्रवास करू नये. मद्यपान करून कोणतेही वाहन चालवू नये.
विद्यार्थ्यांनी मोबाईलपेक्षा वाहतुकीचे नियम पाळून स्मार्ट व्हा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) श्याम लोही यांनी शुक्रवारी (ता. १३) येथे केले.
श्री. लोही यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावर अथवा हायवेवर चालताना किंवा वाहन चालविण्याचे नियम समजावून सांगितले. त्यांनी स्वतःची व इतरांची सुरक्षिता महामार्गावर पाळण्याचे सांगितले. (RTO officer Shyam Lohi Guide to children Be Smart by following traffic rules rather than mobile Jalgaon News)
येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ३२ वे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लोही यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना हेल्मेटवाटप करण्यात आले.
प्राचार्य डॉ. जी. एम. माळवटकर, डॉ. भुसारी, प्रा. अहिरराव, भूषण मोरे, प्रा. डी. व्ही. चौधरी, डॉ. प्रशांत गायधने, प्रा. अडम, प्रा. शैलेश चेके, प्रसिद्धी विभागप्रमुख प्रा. तुकाराम गवळी यांच्यासह दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य माळवटकर म्हणाले, की महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी तरुणांनी आपल्या कुटुंबासह जवळील सर्वांना वाहतुकीचे नियम सांगून हेल्मेट वापरण्याचे महत्त्व सांगा.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा प्रसार व वाहतूक नियमांविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत श्याम लोही यांच्याकडून माहिती घेतली.
वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवा...
श्री. लोही यांनी रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, हिरवा, लाल व पिवळा सिग्नलबद्दलची माहिती दिली. गाडी रस्त्यावर खराब झाल्यास ‘हझार्द’ त्रिकोण वाहनाच्या मागे २० मीटर अंतरावर ठेवावे.
स्पीड लिमिटनुसार वाहने रस्त्यावर चालवावीत व ब्लाएन्ड टर्न जेथे असेल, तेथे अजिबात ओव्हरटेक करू नये. रस्त्यावर कोणताही अपघात झाल्यास प्रत्येकाने अपघात झाल्याची मदत निसंकोचपणे करावी व अपघात झालेला असल्याचे कळवायचे असल्यास दूरध्वनी क्र १०८ वर कॉल करून कळवता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.