Jalgaon News | देशाच्या प्रगतीला गती देणारा अर्थसंकल्प : गिरीश महाजन

Girish Mahajan
Girish Mahajanesakal
Updated on

गिरीश महाजन (ग्रामविकास मंत्री) : अर्थसंकल्प देशाच्या प्रगतीला गती देणारा आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दोन संकल्पावरच देशाच्या प्रगतीचा आलेख मांडला आहे. (Rural Development Minister girish mahajan statement on budget jalgaon news)

यात समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा संतुलीत प्रयत्न केलेला आहे. कृषी क्षेत्रासाठी यंदाही भरीव तरतूद केली आहे. एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्राधान्य देण्याचे धोरण असून, यासाठी पीएम प्रमाण योजना उपयुक्त ठरणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मही प्रगतीसाठी मदत करणार आहेत.

रेल्वेसाठी यंदा विक्रमी २ लाख ४० हजार कोटींची केलेली तरतूदही स्तुत्य आहे. देशात १५७ नर्सींग कॉलेजचा प्रारंभ हा आरोग्यसेवेला बळकटी प्रदान करेल. गोरगरिबांना वर्षभर मोफत धान्याच्या योजनेला मिळाली मुदतवाढ ही सामाजिक न्यायासाठी उत्तम आहे. ग्रामविकासासाठी यंदा भरीव तरतूद केली आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Girish Mahajan
Jalgaon Bribe News : लाच स्वीकारताना महिला तलाठी जाळ्यात

अर्थमंत्र्यांनी सर्वसमावेशक वाढ, वंचितांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित वाढ, युवा शक्ती, वित्तीय क्षेत्र या सात मुद्यांवरून अर्थसंकल्प मांडला आहे. यामुळे देशाची खऱ्या अर्थाने चौफेर प्रगती होणार आहे.

यंदा आयकर खात्याच्या स्लॅबमध्ये बहुप्रतिक्षित बदल केल्यामुळे मध्यमवर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण, रेल्वे, आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार असून, महिलांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना जाहीर झाल्या आहेत. या सर्व बाबी प्रगतीला पूरक आहेत.

Girish Mahajan
Jalgaon News : धानवडच्या शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.