Jalgaon News : दिवाळी साजरी करण्यासाठी गावाकडे आलेले चाकरमाने, नागरिक दिवाळी संपताच आपल्या कामावर परतू लागले आहेत. यामुळे राज्य महामंडळाच्या बसगाड्यांसह रेल्वे, खासगी गाड्यांसाठी गर्दी होत आहे.
रेल्वे व बसस्थानकातील आरक्षण खिडकीसमोरही प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता महामंडळाने जिल्ह्यातून पुणे, मुंबईला जाण्यासाठी नियमित जादा बसगाड्या सोडल्या आहेत. (rush for railways private trains along with buses jalgaon news)
आरक्षणाव्यतिरिक्त बसगाड्यांची संख्याही वाढवली आहे. त्यातून रोजचे लाखोंचे उत्पन्न एसटीसह रेल्वेला मिळत आहे. महिला व ज्येष्ठ प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत असल्यानेही बसगाड्यांना गर्दी आहे. दिवाळीनिमित्त पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांनी आरक्षण करूनच प्रवास करण्याला प्राधान्य दिले असून, तिकीट खिडकीसमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
दिवाळीआधीच महामंडळाने प्रवासी संख्या असलेल्या मार्गावर जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले होते. गर्दीमुळे महामंडळाला चांगलीच कमाई होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने अनेक ठिकाणी जादा बसगाड्या सोडत वाढ केली. यातून रोजच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
रेल्वेला गर्दी
रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सर्वसामान्यांच्या डब्यात पाय ठेवायलाही जागा नाही. मुंबई, पुणे, कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याचे चित्र आहे.
तत्काळ तिकिटासाठी रांगा
रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल झाल्याने तिकीट काढण्यासाठी प्रवासी आता तत्काळ श्रेणीतून तिकीट मिळतेय का? यासाठी सकाळी आठपासूनच रेल्वेस्थानकात आरक्षण खिडकीसमोर रांगा लावत आहेत.
एसटीला नऊ कोटींचे उत्पन्न
जळगाव विभागीय एसटी विभागाला ११ ते १९ नोव्हेंबरदरम्यान नऊ कोटी ७६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यात जळगाव आगाराला सर्वाधिक एक कोटी ५२ लाख, तर सर्वांत कमी उत्पन्न मुक्ताईनगर आगाराला ५६ लाख मिळाले. चोपडा आगाराला एक कोटी सात लाख, तर जामनेर आगाराला एक कोटी २० लाखांचे उत्पन्न मिळाले. रोज ३० हजार किलोमिटर बस धावल्या. रोज ४०० ते ४५० फेऱ्या एसटी बसने केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.