Jalgaon News : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्वच विभागांत धावपळ!

Rush in all departments for present bill on last day of financial year
Rush in all departments for present bill on last day of financial yearesakal
Updated on

जळगाव : आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस अर्थात, ३१ मार्च. शासकीय कार्यालयापासून सर्वांवरच कामाचा अतिरिक्त ताण आणि बॅंकांच्या आर्थिक व्यवहारांची जुळवाजुळव सुरू असल्याचे चित्र शुक्रवारी (ता. ३१) कोशागार विभाग, सर्व विभागांच्या अकाउंट विभागात पाहावयास मिळाले. (Rush in all departments for present bill on last day of financial year jalgaon news)

जमीन खरेदी-विक्री व्यवहारात स्टॅम्प ड्यूटी वाचविण्यासाठी अनेकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात, तर कराचा भुर्दंड वाचविण्यासाठी महापालिकेत कर भरण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे शुक्रवारी बॅंका, कर संकलन कार्यालय, एलबीटी, जीएसटी या सर्वच शासकीय कार्यालयांत गर्दी दिसून आली.

महापालिका कर संकलन विभागातही करआकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ताकराची थकबाकी वसुली सुरू आहे. कर भरणाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी कर संकलन कार्यालये शुक्रवारी सकाळी नऊपासूनच सुरू होती. कर भरण्यासाठी महापालिकेत नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

जिल्हा कोशागार कार्यालयात गुरुवारी (ता. ३०) ३९८ बिले शासकीय विभागांतर्फे सादर करण्यात आली. त्यातील १६ बिलांवर आक्षेप असल्याने ती बाजूला ठेवण्यात आली. १३८ बिले शुक्रवारी काढण्यात आली. मार्चअखेर असल्याने मध्यरात्री बारापर्यंत कार्यालये सुरू होती. रात्री अकरापर्यंत बिले स्वीकारण्यात आली. शुक्रवारी दिवसभर अनेकांनी बिले सादर केली. तीही रात्रीपर्यंत पास करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा कोशागार अधिकारी सुभाष गुंजाळ यांनी दिली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Rush in all departments for present bill on last day of financial year
Jalgaon News : फुकट्या प्रवाशांकडून 15 लाखांचा दंड वसूल; एकाच दिवशी रेल्वे गाड्यांची तपासणी

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन कार्यलयातही आलेला निधी, सादर झालेली बिले अदा करण्यासाठी धावपळ सुरू होती. विविध यंत्रणांनी निधी परत जाऊ नये, यासाठी बिले सादर करून निधी वाचविण्यासाठी धावपळ होती.

वसुली पथक मोहीम

मार्चअखेर असल्याने बॅंका, पतसंस्था, फायनान्स कंपन्यांची वसुली सुरू होती. मालमत्ता व देणी ताब्यात घेण्याची कामे सुरू आहेत. थकबाकी भरण्यासाठी नागरिकांनी वरील कार्यालयांत गर्दी केली होती.

बॅंकांमध्ये रांगा

मार्चअखेरमुळे बॅंकामध्येही वर्दळ दिसून आली. प्रत्येक व्यावसायिक व उद्योजक खरेदी-विक्री, स्टॉक, बॅलन्सशीट याचा आढावा घेऊन नवीन आर्थिक वर्षासाठी सज्ज झाले आहेत. बॅंकांमध्येही कर्ज, व्याजाचे हप्ते, तसेच थकबाकी व दंड वसुलीचा ठोकताळा काढण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे मार्चअखेरचे वातावरण शहरात दिसून आले. पंतप्रधान क्रेडिट लिंक्ड सबसिडीची मुदत बॅंकांच्या माध्यमातून संपुष्टात येणार असल्याने अनेकांनीची धावपळ सुरू होती.

दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व्हर डाउन

तीन दिवसांपासून शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात मार्चअखेरमुळे दस्तनोंदणीच्या कामांचा प्रचंड लोड आहे. त्यात सर्व्हर डाउन होत होते. त्यामुळे कामास विलंब होत होता. मात्र, दस्त नोंद ३१ मार्चपूर्वी व्हायला हवी. यासाठी धावपळ सुरू होती. एका दिवशी ५० ते ६० दस्त नोंदणी होत आहे. गर्दीमुळे सर्व्हर डाउनची अडचण आहे. यामुळे कामाची वेळ वाढविली होती, अशी माहिती जिल्हा सहाय्यक दुय्यम निबंधक सुनील पाटील यांनी दिली.

Rush in all departments for present bill on last day of financial year
Inspirational News : ‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.