जळगाव : रशिया व युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम अनेक वस्तुंच्या किमतीवर होत आहे. प्रामुख्याने खरिप हंगामात लागणाऱ्या खतांच्या किमतींवर त्याचा मोठा परिणाम होणार असून, दरवाढ अटळ मानली जात आहे.
लवकरच खरिप हंगाम सुरू होणार आहे. त्यात पिकांसाठी जिल्ह्यात ९६ हजार मेट्रिक टन खतांचा साठा आहे. जळगाव जिल्ह्याला खरीप हंगामात एकूण अडीच लाख मेट्रिक टन खतांची आवश्यकता असते. उपलब्ध साठा व खतांची उपलब्धता पाहता तो कमी आहे. यामुळे खतांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. किमती वाढण्याअगोदरच शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आतापासूनच खतांची खरेदी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
खरेदीचा आवाहन
युद्धामुळे रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आली असून, भविष्यात खतांचा पुरवठा होईल की नाही? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे खतांच्या दरात वाढ होण्याची भीती आहे. भारतात एकूण खतांच्या आयातीत रशिया, बेलारूसचा वाटा १० ते १२ टक्के आहे. युद्धापूर्वी बेलारूसचे पोटॅश बंदरातून जहाजाद्वारे भारतात आणण्याची योजना आखली होती. परंतु, निर्बंधांमुळे ही योजना धोक्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत उपलब्ध होतील की नाही, याबाबत कृषी विभागालाही शंका आहे. त्यामुळे कृषी विभागाने पत्र काढून, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खतांची खरेदी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
कृषी विभागाला भिती
रशिया, युक्रेन व बेलारूस या देशांव्यतिरीक्त भारत कॅनडाकडून खतांची आयात करतो. मात्र, कॅनडानेदेखील पोटॅशचे उत्पादन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम खतांच्या बाजारपेठेवर होवून, खतांचे भाव वाढण्याची शक्यता आहे. युद्ध आणखी काही दिवस कायम राहिल्यास, खतांच्या आवकेवर परिणाम होईल. त्यातच खतांचे भावदेखील वाढतील, अशी भिती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
४०० रुपयांनी वाढ ?
खतांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पोटॅशची आयात भारतात रशियाकडूनच केली जाते. युद्ध सुरु झाल्यानंतर पोटॅश व फॉस्फरसच्या कच्च्या मालाचा पुरवठाच कमी झाल्यामुळे खतांच्या किमतीत ४०० ते ५०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामाला सुरवात झाल्यानंतर या युद्धाचे कारण देवून, मोठ्या प्रमाणात काळा बाजार होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.