Central Railway Worker : मध्य रेल्वेच्या दहा कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
मुंबई विभागातून ४, नागपूर विभागातून ३, भुसावळ विभागातून २ आणि सोलापूर विभागातून एक अशा दहा कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे आज हा पुरस्कार देण्यात आला.(Safety Award to 10 Central Railway Employees jalgaon news)
ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२३ या महिन्यात कर्तव्य बजावताना त्यांनी दाखवलेली सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे संचालनात सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेले योगदान, या बद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक, दोन हजार रूपये रोख यांचा समावेश आहे.
अशी केली कामगिरी
भुसावळ विभागात कुंदन कुमार, (ट्रॅकमन, माहेजी, भुसावळ विभाग) यांनी २८ आक्टोबर रोजी पेट्रोलिंग ड्युटीवर असताना, परधाडे आणि माहेजी स्थानकादरम्यान रेल्वे तुटलेली दिसली. त्यांनी ताबडतोब लाल सिग्नल देऊन येणारी मालगाडी थांबवली. त्यांनी ताबडतोब सर्व संबंधितांना कळवले आणि मालगाडी सावधगिरीने ५ किलोमिटर वेगाने पुढे निघाली. त्याची सतर्कता आणि मनाची उपस्थिती यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दुसरा पुरस्कार महेंद्र सिंह (लोको पायलट गुड्स, भुसावळ) यांना देण्यात आला. त्यांनी २८ आक्टोबरला गुड्स ट्रेनचे लोको पायलट म्हणून ड्युटीवर असताना, परधाडे स्टेशनजवळ ड्युटी ट्रॅकमनने लाल ध्वज सिग्नल पाहिला. त्यांनी तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली. ५ इंच रेल्वे तुटल्याचे निदर्शनास आले, ट्रेन ५ किमी प्रति तास वेगाने पुढे जाण्यात आली. मोठी दुर्घटना टळली.
यांची होती उपस्थिती
पुरस्कार वितरणावेळी चित्तरंजन स्वैन (अतिरिक्त महाव्यवस्थापक), एम. एस. उप्पल, (प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी), एस. एस. गुप्ता (प्रधान मुख्य संचालन, व्यवस्थापक), राजेश अरोरा (प्रधान मुख्य अभियंता), सुनील कुमार (प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता), एन. पी. सिंग (प्रधान मुख्य) यावेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.