Ayodhya Ram Mandir : देशभरातील संत, महंतांचा जमलाय ‘कुंभमेळा’

अयोध्येत ठिकठिकाणी केलेल्या फुलांच्या भव्य सजावटीमुळे मुख्य रस्त्यावरुन फिरताना झेंडूच्या फुलांचा सुगंध दरवळत असल्याने मन प्रसन्न होते, अशी माहिती भाजपचे जळगाव जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे यांनी ‘सकाळ’शी थेट अयोध्येतून बोलताना दिली.
A floral decoration in an entrance area leading to the Ram temple.
A floral decoration in an entrance area leading to the Ram temple.esakal
Updated on

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ठिकठिकाणी केलेल्या फुलांच्या भव्य सजावटीमुळे मुख्य रस्त्यावरुन फिरताना झेंडूच्या फुलांचा सुगंध दरवळत असल्याने मन प्रसन्न होते, अशी माहिती भाजपचे जळगाव जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे यांनी ‘सकाळ’शी थेट अयोध्येतून बोलताना दिली.

श्री. बऱ्हाटे गेल्या पाच दिवसांपासून संत सेवेसाठी अयोध्येतील तीर्थक्षेत्र पूरम येथे मुक्कामी आहेत. (saints mahants gathers from all over country for ram mandir ayodhya jalgaon news)

ते म्हणाले, की येथे संतांना प्रांतानुसार राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण पाच ठिकाणी लंगरची व्यवस्था आहे. ज्या भागात दक्षिण भारतातील संत उतरले आहेत तेथे इडली सांबार, वडा सांबार सारखे साऊथ इंडियन पदार्थ आहेत तर उत्तर भारतात किंवा महाराष्ट्रातील संतांसाठी पोळी-भाजी, वरण-भात असे जेवण आहे.

आज आमच्याकडे संतांना वाढण्याची जबाबदारी होती. अनेक मोठमोठ्या संतांना वाढताना आनंद तर होतोच शिवाय अंगावर काटा उभा राहतो. आज जेवणात शेवयांची खीर होती. जेवणाची पंगत फक्त संतांची असते. इतरांसाठी बुफे आहे.

मंत्र्यांपेक्षाही जास्त सुरक्षा

येथे अनेक संत येत आहेत. त्यातील काही संतांना एखाद्या मंत्र्यापेक्षाही कडक सुरक्षा आहे. असिमानंदांचे आगमन झाले. त्यांच्याभोवती असलेली कडक सुरक्षा व्यवस्था पाहून मी अवाक् झालो.

A floral decoration in an entrance area leading to the Ram temple.
Ayodhya Ram Mandir : पुण्य पदरात पाडून घेण्याचा उद्या महत्त्वाचा दिवस, श्री राम विराजमान होतील तेव्हा नक्की करा या गोष्टी

एकपात्र जाणवले संत कितीही मोठे असले तरी त्यांचे बोलणे विनयशील वाटले.

महामंडलेश्वर जनार्दन महाराज सर्व संतांशी दिवसभर हसमुख चेहऱ्याने सहज संवाद साधत असतात. आज संध्याकाळी अयोध्येच्या मुख्य रस्त्यावर फेरफटका मारायला गेलो, तेथे मुख्य चौक फुलांनी सजविले आहेत.

नव्या मंदिराकडे जाण्यासाठी एक मुख्य व दोन तात्पुरते प्रवेशद्वार आहेत. दोन ठिकाणचे प्रवेशद्वार परिसर झेंडू, जरबेरा व काही प्रमाणात गुलाबाच्या फुलांचा वापर करून सजविले आहे.

रस्त्यावर फुलांचा सुगंध दरवळत असतो, असे बऱ्हाटे म्हणाले.

A floral decoration in an entrance area leading to the Ram temple.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर उत्सवाची जगाच्या इतिहासात नोंद घेतली जाईल - मंत्री चंद्रकांत पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.