SAKAL Impact | अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश : एम. राजकुमार

jalgaon Superintendent of Police M. the rajkumar
jalgaon Superintendent of Police M. the rajkumaresakal
Updated on

जळगाव : जिल्‍ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याची सूचना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिल्या आहेत. सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाईला सुरवात झाली आहे. (SAKAL Impact m rajkumar Order of action on illegal business jalgaon news)

शहरातील स्वातंत्र्य सेनानी मीरशुक्रूल्ला उद्यानात पोलिस वसाहतीसमोरच सट्ट्याचा अड्डा चालविला जात असल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. डीवायएसपी संदीप गावित यांच्या आदेशाने जिल्‍हापेठ पोलिसांनी कारवाईसाठी धाव घेतली. मात्र, सट्ट्यांचा धंदा आवरला गेला हेाता. त्या ठिकाणी गॅस पंपाचा अड्डा आढळून आला. त्यानंतर बी. जे. मार्केटमध्ये सोरट, गुडगुडी, श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात ओपन-क्लोज सट्टा सुरू होता.

शहरात कारवाई सुरू असताना, दीपक गुप्ता यांनी अवैध धंद्याबाबत लाईव्ह शूटिंग करून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला. नंतर ई-मेलद्वारे तक्रारी केल्या होत्या. त्याची जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गंभीर दखल घेत सर्वच ३५ पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेला तत्काळ अवैध धंद्यांवर कारवाई करून त्याचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

jalgaon Superintendent of Police M. the rajkumar
Jalgaon Crime News : दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवणारा अटकेत

जिल्‍हापेठ पोलिसांचा अजब दावा

शाहूनगर ट्रॅफिक गार्डनमध्ये शुक्रवारी (ता. २५) सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सट्टापेढीवर छापा टाकला. मात्र, टीप मिळाल्याने सट्ट्याचा अड्डाचालक पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, पोलिस पथकाची नजर गॅस पंपावर पडली. पथकाने कारवाई करत दोन सिलिंडरसह वीजमोटार, असा २० हजारांचा ऐवज जप्त करून आणला.

नंतर काही तासांतच हा गॅस अड्डा पुन्हा सुरू झाला. परत ‘सकाळ’ने पाठपुरवा करून सोमवारी (ता. २८) गॅस पंप पूर्ववत सुरू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. आता करवाई करणाऱ्या सहाय्यक निरीक्षक किशोर पवार यांनी हा गॅसपंप दुसराच कुणी तरी माणूस चालवीत असल्याचा दावा केला आहे.

"कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्‍ह्यात अवैध धंद्याबाबत सर्व पोलिस ठाण्यांना कारवाई करण्याबाबत तातडीचे आदेश दिले आहेत. पोलिस ठाणे पातळीवर झालेल्या कारवाईचा अहवालही रोज सादर करण्याच्या सूचना संबंधित पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत."

-एम. जयकुमार, जिल्‍हा पोलिस अधीक्षक

jalgaon Superintendent of Police M. the rajkumar
Jalgaon Crime News : दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवणारा अटकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()