Sakal Impact : येथील बसस्थानकामागे पुरातन भिंत असून, यातून गावात जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून येथील खालचा भाग तोडून कमानीसारखे करण्यात आले होते. यातून विद्यार्थी, पायी प्रवास करणारे व दुचाकी स्वार यासह खासगी रिक्षा जात होत्या. (sakal impact Removed upper part of ancient dangerous wall jalgaon news)
कालांतराने हा जीवघेणा शॉर्टकट रस्ता अपघाताला कारणीभूत ठरत होता. या ठिकाणी मध्यभागी लोखंडी अडोसा देत फक्त पायी प्रवासी करणारे व दुचाकी स्वार ये- जा करू लागले.
मात्र या शॉर्टकट बोगद्यावरील कमान दगडांची असल्यामुळे व भिंत जीर्ण झाल्यामुळे अपघाताची शक्यता होती.तसेच वेळोवेळी ‘सकाळ’ने नगरपालिका व पुरातत्त्व विभागाचे लक्ष वेधून वेळोवेळी पाठपुरावा केला.
सामाजिक संघटनांच्या माध्यमातून हा प्रश्न तडीस नेला. त्यामुळे पालिकेने गुरुवारी (ता. ३) या शॉर्टकट बोगद्याच्या वरची दगडाची कमान काढली. त्यामुळे नागरिकांसह सामाजिक संघटनांनी ‘सकाळ’चे आभार मानले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पालिकेने या परिसरातील शॉर्टकट बोगद्याची डागडुजी करून सदर परिसर ये- जा करण्यासाठी सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पारोळा शहरात बसस्थानकापासून गावात प्रवेश करताना कजगाव नाका सोडला तर इतर कुठेही रस्ता नाही.
त्यामुळे पर्यायाने शहरातील नागरिक हे बसस्थानक मागील शॉर्टकट बोगद्यातून ये-जा करतात. तसेच शहरात अनेक शैक्षणिक संस्था असून. यातील विद्यार्थी देखील ग्रामीण भागात असल्यामुळे बसस्थानकावर येण्यासाठी ते याच मार्गाने जातात. त्यांना दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.