जळगाव : तरसोद ते चिखली दरम्यान नव्याने तयार केलेल्या महामार्गावर काही दिवसांपासून तडे पडले आहेत. तड्यांनी वाहनांची चाके पंक्चर होण्याचे प्रकार वाढले आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने रविवारच्या (ता. २९) अंकात प्रकाशित करताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दखल घेत संबंधित कंत्राटदाराला तडे भरण्याचे आदेश दिले. रविवारी सकाळीच तडे भरण्याच्या कामास सुरवात झाली. दुपारपर्यंत तडे भरण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर सुसाट वेगाने वाहने धावतात. मात्र महामार्गावरील नशिराबादजवळील टोल नाक्याच्या पुढे अनेक ठिकाणी तडे पडले होते. त्या तड्यांनी वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते. तो कशीबशी गाडी नियंत्रित करतो. मात्र तड्याच्या ठिकाणी असलेल्या अणकुचीदार खडीमुळे वाहनाची चाके पंक्चर होताहेत. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित करताच. रविवारी सकाळीच संबंधित कंत्राटदाराला महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पडलेले तडे लागलीच बुजवून रस्ता पूर्ववत करण्याची सूचना केली.
अपूर्ण कामांचे काय ?
महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावर पडलेले तडे तर भरले, मात्र अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. साईड रोडवर जाताना खडी पडलेली आहेत. यामुळे वाहने घसरतात. याबाबतही कार्यवाही करण्यास संबंधित कंत्राटदारास समज देण्याची मागणी वाहनधारकांची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.