Jalgaon News : ‘सकाळ एनआयई' व श्री चैतन्य हॉस्पिटलतर्फे बच्चे कंपनीला धमाल मौजमस्ती करण्यासाठी उन्हाळी शिबिर आयोजित केले असून, त्याला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे शिबिर २४ ते २८ एप्रिल असे पाच दिवस होईल. (sakal NIE summer camp starts from 24 april nashik news)
शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सकाळ- एनआयई’तर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी उन्हाळी सुटीत विशेष शिबिरही होत असते. यंदा 'एनआयई’च्या शिबिराला डॉ. अविनाश भोसले आणि डॉ. शीतल भोसले यांच्या श्री चैतन्य हॉस्पिटलचे पाठबळ मिळाले असून, या शिबिरातून विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील.
शिवाय, त्यांच्या आरोग्याबाबतही प्रबोधन करण्यात येणार आहे. शिबिर भास्कर मार्केटजवळ श्रीश्रीमाळ हॉस्पिटलसमोरील भारतीय जैन संघटना हॉलमध्ये होईल. त्यासाठी भारतीय जैन संघटनेचे, तसेच भुसावळ येथील नंदग्राम गोधामचे संचालक अभिलाष संतोषकुमार नागला, मार्गदर्शक पंडित रविओम शर्मा, जळगाव शहरातील हॉटेल सुलक्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
नोंदणीसाठी हे करा..!
शिबिराच्या समारोपाच्या दिवशी भुसावळ येथील नंदग्राम गोधाम या आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी सहल नेण्यात येईल. शिबिरात ५ ते १५ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. नावनोंदणीसाठी २०० रुपये नाममात्र शुल्क असून, त्यासाठी समन्वयिका हर्षदा नाईक यांच्याशी ८२७५५८८७९१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
शिबिराची वैशिष्ट्ये आणि मार्गदर्शक
* डान्स : शरद मोटे
* क्राफ्ट : सलोनी वाणी
* पक्षी निरीक्षण : शिल्पा गाडगीळ
* महाराष्ट्रातील प्राचीन किल्ले व संस्कृती : देवदत्त गोखले
* अनबॉक्स क्रिएटिव्ह लर्निंग ऍक्टिव्हिटी : मनोज गोविंदवार
* गूड टच बॅड टच : देवयानी गोविंदवार
* फनी गेम्स, मेंटल हेल्थ आणि योगा : सीमा देशमुख
* पारंपरिक जुने खेळ : आकाश धुमाळ
* मोबाईल आणि स्क्रीन टायमिंग : डॉ. अविनाश भोसले
* विविध भाषांचे ज्ञान : विपीन बिमटे
विशेष आकर्षण : नंदग्राम गोधामची (भुसावळ) अनोखी सफर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.