Jalgaon News : महापालिकेतील ९३ कार्यरत कर्मचारी वगळता उर्वरित ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे,लवकरच कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी सक्रांत भेट दिली आहे. (Salary of 788 jalgaon municipal employees as per 7th commission jalgaon news)
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय रखडला होता. तो आता मार्गी लागला डिसेंबर २०२३ च्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करून पगार केले जाणार आहेत. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २०२३चे वेतन थांबविण्यात आले होते.
प्रशासनाकडून दोन दिवसात सातवा वेतन आयोग लागू करून पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु असून शुक्रवार (ता.१२ ) किंवा सोमवारी(ता.१५)रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होईल, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
परंतु यामध्ये उड्डाण पदोन्नती धारक ९३ कार्यरत कर्मचाऱ्यांना वगळण्यात येणार आहे. सदर ९३ कर्मचाऱ्यांना जानेवारी अखेरपर्यंत सातवा वेतन आयोग लागू करून त्यांचे पगार करण्यात येतील, असेही मनपाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
उड्डाण पदोन्नतीधारकांना लाभ
तत्कालीन नगरपालिकेने ३७८ कर्मचाऱ्यांना उड्डाण पदोन्नत्या दिल्या होत्या. त्यापैकी ३९ कर्मचारी मयत झाले असून २४६ कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत.
तर, ९३ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सदर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.