एरंडोल : हनमंतखेडेसीम (ता. एरंडोल) येथील गिरणा नदीपात्रातून रोज रात्री ४० ते ५० वाहनांद्वारे वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असून, महसूल प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या पथकाने परिसरात रात्री गस्त घातल्यास वाळू चोरीबाबत वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. वाळू चोरीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
आवश्य वाचा- मनपा टीम, जनतेच्या सहकार्याने कोरोनाशी ‘दोन हात’
हणमंतखेडेसीम येथून रोज रात्री महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुमारे ४० ते ५० वाहनांतून वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक होत आहे. जिल्ह्यात वाळूचे ठेके बंद असताना हणमंतखेडे व उत्राण परिसरातून वाळू वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे. वाळूमाफियांची मोठी दहशत या परिसरात निर्माण झाली असून, वाळू चोरीविरोधात तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांना वाळूमाफिया आणि त्यांच्या साथीदारांकडून धमकाविण्यात येते.
चोरट्या मार्गाने वाहतूक
हणमंतखेडेजवळ असलेल्या वाळू ठेक्याचा लिलाव झाला आहे. मात्र, वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्यामुळे ठेकेदारास आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वाळू वाहतुकीकडे तलाठी, मंडलाधिकारी व महसूल कर्मचारी स्वार्थासाठी दुर्लक्ष करीत आहेत.
जादा दराने विक्री करून लूट
वाळूमाफियांना पायबंद घालण्यास स्थानिक महसूल कर्मचारी पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने वाळू वाहतूक होत असल्याचे ग्रामस्थ उपहासात्मकपणे बोलत आहेत. वाळूमाफिया वाळूची जादा दराने विक्री करून सर्वसामान्य नागरिकांची लूट करीत आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून वाळू चोरट्यांविरुद्ध कारवाई करून वाळूमाफियांना कोणाचा आशीर्वाद आहे याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.