Jalgaon Crime News : वाळूमाफियांचा पोलिसांवर हल्ला; पोलिसांचीच तक्रार घेण्यास ठाणे अंमलदाराची ‘ना’

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Jalgaon News : जिल्‍हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या संयुक्त बैठकीनंतर वाळू चोरट्यांसाठी मुख्यालयातील पोलिसांच्या गस्तीचे नियोजन केले असून, सौखेडा शिवारात गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांवर वाळूमाफियांनी हल्ला करून पळ काढला.

ही घटना शनिवारी (ता. २०) पहाटे घडली. सुदैवाने दोन्ही पोलिस कर्मचारी सुखरूप आहेत. मात्र, त्यांची तक्रार घेण्यासही तालुका पोलिस ठाण्यातील अंमलदाराने स्पष्ट नकार देत पिटाळून लावले. (Sand mafia attack on police Police Station officer Say No to take police complaint Jalgaon News)

एकीकडे राज्य सरकार राज्यात नवे वाळू धोरण अंमलात आणत आहे. दुसरीकडे वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे.

जिल्‍हाधिकारी अमन मित्तल आणि पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पोलिस अधीक्षकांनी मुख्यालयातील अतिरिक्त पोलिस कर्मचारी रात्र गस्तीसाठी नियुक्त केले आहेत.

त्या पोलिसांतर्फे दुचाकीवरून सौखेडा, निमखेडी, अव्हाणे-कानळदा रोड परिसरात गस्त करण्यात येत आहे. अवैध वाळू वाहतुकदारांची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात व नियंत्रण कक्षास कळवून कारवाई करण्यात येते.

Crime News
MSRTC News : मालेगावची बस गुजरातच्या जंगलात बंद पडली!

थोडक्यात वाचला जीव

नदीपात्रातून डंपर व ट्रॅक्टर वाळू भरून निघताना त्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी दुचाकीस्वार उभे असतात. हे दुचाकीस्वार त्या वाहनाला मार्ग मोकळा करून देतात. शनिवारी रात्री मुख्यालयातील दोन पोलिस कर्मचारी नेहमीप्रमाणे रात्री गस्तीवर होते.

मध्यरात्री अडीचच्या सुमारास सौखेडा शिवारात वाळू वाहनाला पायलटिंग करणाऱ्या, काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर लाकडी दांड्याने हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्याने भांबावून गेलेले पोलिस रस्त्यावर पडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Crime News: 'सुट्टीसाठी गावावरून आणलं अन्...' वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याला अटक

संशयितांनी पोलिसांना शिवीगाळ करून महामार्गाच्या दिशेने धूम ठोकली. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती व तक्रार देण्यासाठी तालुका पोलिस ठाणे गाठले. तेथे उपस्थित ठाणे अंमलदाराला घडलेला प्रकार ऐकवीत असतानाच ठाणे अंमलदाराला फोनवर सूचना आल्या.

दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर ठाणे अंमलदाराने तक्रार घेण्याऐवजी दोघी पेालिस कर्मचाऱ्यांना ‘तुम्ही मद्यप्राशन केले आहे. तुमची तक्रार घेता येणार नाही’, असे सांगत दोघांना पिटाळून लावले.

Crime News
Nashik News : अखेर मालेगावात पकडलेल्या 'त्या' 53 उंटांची झाली घरवापासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.