Jalgaon Crime: महसूल पथकावर वाळूमाफियांचा हल्ला; कांताई बंधारा परिसरात मध्यरात्रीचा थरार

Bikes and car recovered from the spot
Bikes and car recovered from the spotesakal
Updated on

Jalgaon Crime : कांताई बंधाऱ्याजवळून बेकायदेशीर वाळू चोरून नेणाऱ्या ट्रॅक्टर ताब्यात घेत महसूल विभागाच्या पथकाने मध्यरात्री एकच्या सुमारास जप्त केले.

टॅक्टर ताब्यात घेऊन एरंडेाल पोलिसांत नेत असताना चोरटक्की गावाजवळ सुसाट बोलेरो जीपने पथकाचा रस्ता अडवून लाकडी दांडके, शस्त्रासह आलेल्या गुंडानी प्राणघातक हल्ला करून ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर पळवून नेले.

एरंडोल पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून वाळूमाफियांची मुजोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे. (Sand mafia attack on revenue squad Midnight thrills in Kantai Dam area Jalgaon Crime)

वाळूचोरी रेाखण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यातर्फे विशेष प्रयत्न सुरू असून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर दिवसरात्र कारवाई सुरू आहे.

महसूल विभागाने नियुक्त केलेल्या पथकात एरंडोल-नायब तहसीलदार किशोर माळी, सलमान तडवी (तलाठी-एरंडोल), सुरेश कटारे (तलाठी रिंगणगाव), सुधीर मोरे (तलाठी-विखरण), अतुल तागडे (तलाठी टोळी), बालाजी लोंडे (तलाठी फरकांडे), श्रीकांत कासुंदे (तलाठी नागदुली) अशांचे पथक गौणखनिज चोरट्यांवर कारवाईसाठी शनिवारी (ता.३०) रात्र गस्तीवर होते.

मध्यरात्रीनंतर हे पथक त्यांचे शासकीय वाहन (एमएच.१९.बी.जे.३४०३) घेऊन कांताई बांधारा परिसरात गस्त घालत असताना त्यांना निळ्यारंगाचे ट्रॅक्टर वाळू चोरुन नेताना आढळून आले.

पथकाने त्याला थांबवून चालकाला नाव गाव विचारले असता त्याने सागर श्रीराम गवळी तर ट्रॅक्टर मालकाचे नाव श्रीराम विष्णू गवळी(रा. खेडी. ता. एरंडोल) असे सांगितले.

Bikes and car recovered from the spot
Crime News : मृत्यूचे तांडव! जमिनीच्या वादातून 6 जणांची हत्या; एकाचा बदला घेण्यासाठी पाच जणांना संपवलं, परिसरात दहशत

या ट्रॅक्टरमध्ये साधारणतः एक ते दीडब्रास वाळू भरलेली असल्याने पथकाने हे ट्रॅक्टर ताब्यात घेत घटनास्थळावरुन एरंडोल पोलिस ठाण्याकडे घेवुन जात असतांना चोरटक्की गावाजवळ सुसाट बोलरेा जप्त ट्रॅक्टरच्या समोर आडवी लावून त्यातून उतरलेल्या पाच-सहा सशस्त्र गुंडानी फावडे, कुर्हाड घेवुन महसुल पथकावर हल्ला चढवला.

ट्रॅक्टर जप्त करुन नेणाऱ्या तलाठींना खाली उतरवून मारहाण सुरु केली. पथकाला जीवेठार मारण्याची धमकी देत पथकाच्या दिशेने तुफान दगडफेक केली.

दगडफेक सुरु असताना जप्त ट्रॅक्टरवरील चालक समाधान सोनवणे याने रस्त्यातच वाळू उपसून पळ काढला. नायब तहसीलदार किशोर शिवाजी माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एरंडोल पोलिसांत संशयितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारसायकली ताब्यात

महसुल पथकावर हल्ला झाला त्या ठिकाणावर वाहने सोडून काहींनी पळ काढला असून पथकाने माहिती दिल्याप्रमाणे पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Bikes and car recovered from the spot
Mumbai Police Crime: अरे बापरे ; पोलिसालाच घातला ३२ लाखाचा गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.