Jalgaon Crime: तब्बल 7 वर्षे गुंगारा देणाऱ्या वाळूमाफिया मुकुंद ठाकूरला नाशिकमध्ये अटक

पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न, वनजमीन घोटाळ्यासह इतर गुन्ह्यांत वाँटेड
The police team after arresting the sand mafia, which has been operating for seven years.
The police team after arresting the sand mafia, which has been operating for seven years.esakal
Updated on

Jalgaon Crime : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न, फसवणूक आणि बनावट दस्तऐवजाद्वारे वनजमीन विक्री प्रकरणातील प्रमुख संशयित तथा वाळूमाफिया मुकुंद बलविंदरसिंह ठाकूर (५७, रा. बळिराम पेठ) याला आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने नाशिकमध्ये बेड्या ठोकल्या.

न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (Sand mafia Mukund Thakur arrested in Nashik for 7 years Jalgaon Crime)

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर उड्डाणपुलावर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरद्वारे पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात २०१६ मध्ये वाहनचालक-मालक आणि वाळू ठेकेदाराविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

तब्बल दोन वर्षे मुकुंद ठाकूर यास पोलिस पकडू शकले नाहीत. गुन्हेशाखेने मध्य प्रदेशात सापळा रचला असता तेथूनही तो निसटला होता. त्यानंतर त्याच्याविरुद्ध जिल्‍हा पेठ पेालिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल असतानाच मुकुंद ठाकूर वनजमिनीचे सौदे करून पैसा उकळत राहिला. शहरातील मोठमोठी मंडळी, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर आणि उच्च शिक्षित मंडळींना ठाकूर गँगने सरकारी जमिनी विकून बक्कळ पैसा कमावला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The police team after arresting the sand mafia, which has been operating for seven years.
Pune Crime News : पुण्यात पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या! सात महिन्यांची चिमुरडी झाली पोरकी; परिसरात एकच खळबळ

अशी झाली अटक

पाच-सात वर्षांपासून रेकॉर्डवरील फरारी संशयित मुकुंद ठाकूर याच्या शोधार्थ जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हेशाखेला आदेशित केल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक किसन नजन पाटील यांना मुकुंद ठाकूरची गोपनीय माहिती हाती लागली.

नाशिक रोड येथील बिटको चौकातील एका हॉटेलमध्ये मुकुंद ठाकूर असल्याचे तांत्रिक विश्लेषकांनी पॉइंट आउट केल्यानंतर अश्रफ शेख, दीपक पाटील, दीपक गुंजाळ यांच्या पथकाने त्याला अलगद हॉटेल गाठले.

वेटरला दार ठोठवायला लावून दार उघडताच ठाकूरवर झडप टाकून ताब्यात घेण्यात आल्याचे पथकाने सांगितले. संशयितास जिल्‍हा व सत्र न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने संशयितास १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत दिली.

The police team after arresting the sand mafia, which has been operating for seven years.
Nagpur Crime : दारूच्या नशेत आधारकाठीने केला जन्मदात्या पित्याचा खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.