Jalgaon Sand News : बांभोरी पुलाखालचे तळ पोखरले... आता रेल्वे पुलालगत वाळू तस्करी

Sand pumping under the railway bridge in Girna Patra
Sand pumping under the railway bridge in Girna Patraesakal
Updated on

Jalgaon Sand News : महसूल- पोलिस विभागाच्या संयुक्त मोहिमा सुरु असल्या तरी वाळू माफियांची मुजोरी कमी होत नसल्याचे चित्र आहे. गिरणा पात्रात महामार्गावरील बांभोरी पुलाखालचा भाग वाळू उपशाने पोखरून निघाल्यानंतर आता माफियांनी आपला तळ रेल्वे पुलाखालच्या भागात हलविला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे पुलालगत पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरु असून त्यामुळे पुलाचे फाउंडेशन धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातून वाहत येत जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर गिरणा नदीपात्रात प्रत्येक ठिकाणाहून वाळूचा बेसुमार उपसा होताना दिसतो. (Sand smuggling along railway bridge in Girna Patra jalgaon news)

अगदी नांदगाव-चाळीसगावच्या सीमेपासून थेट गिरणा नदी तापीला ज्या श्रीक्षेत्र रामेश्‍वर स्थळी मिळते, त्या संपूर्ण २४० किलोमीटरच्या प्रवासात नदीपात्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे आहेत. गिरणेतील या वाळूसाठ्यांवरच जळगाव जिल्ह्यातील काही गुंड, माफिया कोट्यधीश झाले असून वाळूचा उपसा अविरत सुरुच आहे.

बेसुमार वाळू उपसा

जिल्ह्यातील तापी व अन्य नद्यांपेक्षा गिरणा पात्रात वाळूसाठा मुबलक प्रमाणात असल्यामुळेच या २४० किलोमीटर लांबीच्या पात्राकडे वाळू माफिया डोळे लावून असतात. दिवसेंदिवस पात्रातील वाळूसाठा संपविण्याच्या दिशेने माफियांची मजल गेली आहे.

दररोज हजारो ब्रास वाळू पात्रातून उपसा होते व ती अवैधरीत्या वाहून नेली जाते. बेसुमार वाळू उपशामुळे कमालीचे बोडके झाले आहे. पात्रात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये बुडून अनेकांचे बळी गेले आहेत. आजही अशा घटना वारंवार घडत आहे.

नदीवरील पूलही धोक्यात

गिरणा नदीपात्रात बांभोरी गावाजवळ महामार्गावरील पुलाखालच्या वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा झाला आहे. पुलाच्या फाउंडेशनपासून २०० मीटरपर्यंत वाळू उपसा करता येत नाही. असा नियम असताना हा नियम माफियांनी सर्व नियम पायदळी तुडवले आहे. त्यामुळे बांभोरी पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

Sand pumping under the railway bridge in Girna Patra
Special Train : अमरावती- पुणे, बडनेरा- नाशिकदरम्यान रेल्वेच्या उत्सव विशेष ट्रेन चालविणार

तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या पुलाच्या फाउंडेशनपासून दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत उपसा करता येणार नाही. असे निर्देश दिले होते. मात्र, त्याचाही उपयोग झालेला नाही. सध्यातरी बांभोरी पुलाखालच्या पात्रात वाळूच शिल्लक नाही अशी स्थिती असून त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचीही शक्यता व्यक्त होतेय.

आता रेल्वे पुलाखालून उपसा

बांभोरीजवळील महामार्गावरील पुलाची अवस्था बिकट असताना आता माफियांनी आपला मोर्चा पुढे नेत रेल्वेच्या पुलाखालून वाळू उपसा सुरु केला आहे. जळगाव- सुरत रेल्वे मार्गावर सिंगल लाइन असताना लोखंडी पूल अनेक वर्षांपासून उभा आहे. या पुलाला अनेक वर्षे झाल्यामुळे पुलावरून जाताना सुरक्षेच्या कारणामुळे रेल्वेची गती कमी करण्यात येते. डाऊनच्या रेल्वे गाड्यांसाठी बाजूला नव्याने पूल झाला असून या दोन्ही पुलांच्या खाली पात्रातून वाळू उपसा सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही पुलांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

जिल्हाधिकारी दखल घेतील?

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगावचा पदभार स्वीकारल्यानंतर कामांचा धडाका लावला आहे. वाळूमाफियांवर जरब बसविताना महसूल- पोलिस दलाचे संयुक्त पथक काम करत असून त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने वाळू उपशावर पूर्ण नियंत्रण मिळविणे कठीण असून त्यामुळेच गिरणाचे पात्र ओरबाडणे सुरु आहे. रेल्वे पुलाखाली सुरु असलेली वाळू तस्करीची जिल्हाधिकारी गंभीरतेने दखल घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Sand pumping under the railway bridge in Girna Patra
CM Eknath Shinde : महर्षी वाल्मीकी महामंडळ‌ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.