Jalgaon Accident News : ‘त्या’ अपघाताची दुसऱ्या दिवशीही नोंद नाहीच

accident
accidentesakal
Updated on

Jalgaon Accident News : रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर ८० फूटी रोडवर बुधवारी (ता. १२) सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीजवळ उभ्या मुलाला चिरडण्याचा प्रयत्न एका वाळू ट्रॅक्टरचालकाने केला होता. (sand tractor driver tried to crush boy standing near bike and crime was not reported to police jalgaon accident news)

नागरिकांनी ट्रॅक्टरचालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, दुसरा दिवस उलटूनही याप्रकरणी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. रामानंदनगर पोलिस ठाण्याजवळच वर्धमान हाईट्‌स अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये नीतेश काळे (वय १४) आईसह वास्तव्यास आहे. बुधवारी त्याच्या आतेभावासोबत दुचाकीवरून तो किरणा दुकानावर जाण्यासाठी निघाला.

दुचाकी बंद पडल्याने रस्त्यावर दुचाकी उभी करून त्याचा आतेभाऊ घरी पाकिट घेण्यासाठी गेला. त्यावेळेस नीतेश उभ्या दुचाकी (एमएच १९, जीएस ६५०४)जवळच थांबला होता. त्यावेळेस विनाक्रमांकाचे वाळू ट्रॅक्टर (एमएच १९, सीझेड ५९५) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता हयगयीने ट्रॅक्टर रिव्हर्समध्ये जोरात घेत दुचाकीसह उभ्या नीतेशला चिरडण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

accident
Jalgaon Crime News : दरोड्याच्या प्रयत्नातील टोळीचा पर्दाफाश; 74 हजारांचा मुद्देमाल जप्त

या अपघातात नीतेशच्या पायाला, पाठीला व खांद्याला जबर दुखापत झाली. अपघात घडताच परिसरातील रहिवाशांनी आरडाओरड केल्याने नीतेशचा जीव थोडक्यात वाचला. नागरिकांनी पकडून ट्रॅक्टरचालक गौरव नंदू वाघ (वय २१, रा. सावखेडा) याला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्याच्याविरुद्ध दुसऱ्या दिवशीही कुठल्याच गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. जखमी नीतेश याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

accident
Jalgaon Crime News: केळी व्यापाऱ्याची 7 लाखांत फसवणूक; सौदा एका ट्रकचा अन् 2 ट्रक केले परस्पर नावावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.