Sand Transport News : अवैध वाळू वाहतुकीला विरोध; तरुणाचा खून

Crime News
Crime Newsesakal
Updated on

कळमसरे (ता. अमळनेर) : मांडळ येथे शेतात पाणी भरण्यासाठी गेलेला तरुण सोमवारी (ता. १६) ट्रॅक्टर अंगावर आल्याने जबर जखमी झाला होता. उपचारादरम्यान मंगळवारी (ता. १७) त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेला अवैध वाळू वाहतुकीची किनार असून, दोन दिवसांपूर्वी वाळू नेण्यास विरोध केल्यानेच ट्रॅक्टर अंगावर घालून खून झाला. या घटनेने तालुक्यासह जिल्हा हादरला आहे.

जयवंत यशवंत कोळी (वय ३६) लौकी नाला परिसरात शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर गेल्याने ते जबर जखमी झाल्याची माहिती गावात एकाने दिली. त्यानंतर जयवंत कोळी यांना नातेवाईक व ग्रामस्थांनी तत्काळ स्थानिक डॉक्टरांकडे नेले.

जयवंत कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तत्काळ धुळ्याला हलविले. मात्र, काही वेळेतच त्यांचा मृत्यू झाला. (Sand Transport News Opposition to illegal sand transport Murder of a young man Jalgaon News)

Crime News
Nashik News : शासकीय कार्यालयांचा मालमत्ता कर थकीत!

अशोक लखा कोळी दुचाकीने रस्त्यावर थांबून होता व त्यांचे ट्रॅक्टर नाल्यात उभे करून विशाल अशोक कोळी, सागर अशोक कोळी, विनोद अशोक कोळी, रोहन बुधा पारधी, पिंटू शिरपूरकर (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. मांडळ) वाळू भरत होते. त्यावेळी जयवंत कोळी यांनी अशोक कोळी यास हटकले व ‘तुम्ही रात्री तो वाळू भरत जाऊ नका, तुमच्या वाळू वाहतुकीमुळे रस्ता खराब झाला आहे, या रस्त्याने तुमची वहीवाट नाही’, असे बोलून त्याचे अर्धवट भरलेले ट्रॅक्टर जयवंत याने परत केले होते. त्याचा राग मनात धरून त्या दिवसापासून अशोक लखा कोळी द्वेश भावनेने पाहत होता.

दरम्यान, जयवंत कोळी यांनी दोन दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर अडविले होते. यातूनच वाद झाल्याचीही चर्चा आहे. मंगळवारी घटनादरम्यानही वाद झाल्याचे सांगण्यात येत असून, यातच ही घटना घडल्याची चर्चा आहे. हा अपघात आहे की खून, असा संशय व्यक्त होत असून, घटनास्थळी मारवडचे सहाय्यक पोलिस पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, उपअधीक्षक राकेश जाधव यांनी पाहणी केली.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

Crime News
Nashik News: आचारसंहितेत अडकला Namami Goda Project; राज्य निवडणूक आयोगाकडे NMCने मागितली परवानगी

दरम्यान, तालुक्यात महसूल प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही घटना घडली आहे, असाही आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. कुंभकर्णी सोंग घेणाऱ्या महसूल प्रशासनाच्या कानाडोळा असल्याने वाळू वाहतुकीला लगाम नसून नेमके पाणी कुठे मुरते आहे, हेच पाहण्याची गरज आहे.

पत्नीचा आक्रोश मन हेलावणारा

जयवंत कोळी अवैध वाळू वाहतुकीचा बळी ठरला. मात्र, त्याचे कुटुंब पोरके झाले. जयवंत कोळी यांच्या पत्नीचा आक्रोश मनाला हेलावाणारा होता. माझ्या पतीचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांना अटक करा, त्यांच्यावर कारवाई करा, असे म्हणत जयवंत कोळी यांचा मृतदेह विछेदनानंतर थेट तहसील कार्यालयात आणला होता. जोपर्यंत गुन्हेगारांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्यावर पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी नातेवाइकांची समजूत काढून गुन्हेगारांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

Crime News
Pune Crime News : मेट्रो सुरू व्हायच्या आधीच चोरट्यांनी मारला डल्ला; साहित्याची चोरी

सहा जणांविरुद्ध गुन्हा

सोमवारी (ता. १६) रात्री नऊ ते मंगळवारी (ता. १७) सकाळी साडेसातदरम्यान पती जयवंत कोळी शेतात एकटे असताना, त्यांना संगनमताने मारहाण करून फावड्याने त्यांच्या गुप्तभागावर मारून दुखापत करून त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेऊन त्यांना ठार केले आहे, अशी फिर्याद मृत जयवंत कोळी यांच्या पत्नी शुभांगी कोळी यांनी वरील सहा जणांविरुद्ध दिली आहे. मृत जयवंत कोळी यांच्यावर त्यांच्या गावी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन लहान मुले, आई, वडील असा परिवार आहे.

Crime News
Nashik News : वणी- नाशिक रस्त्यावरील वलखेड फाट्यावर गाडी संपूर्ण जळून खाक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()