Success Story : आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले! सख्खे भाऊ केंद्रीय राखीव पोलिस दलात...

Sandeep and Akash Tiramali selected in the Central Reserve Police Force jalgaon success story news
Sandeep and Akash Tiramali selected in the Central Reserve Police Force jalgaon success story news
Updated on

Success Story : घरात अठरा विश्व दारिद्रय, पाचवीला कायमच पुजलेला संघर्ष अशा स्थितीत आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडत वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील दोघा सख्ख्या भावंडांनी यशाला गवसणी घालत केंद्रिय राखीव पोलिस दलात झेंडा फडकावला आहे.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या भावंडांनी हे यश मिळवले आहे. त्यांचे परिसरात कौतुक होत आहे. (Sandeep and Akash Tiramali selected in the Central Reserve Police Force jalgaon success story news)

वरखेडे येथील नाना तिरमली यांची घरची परिस्थिती जेमतेम. दीड बिघा जमीन. पत्नी आणि दोन मुले, एक मुलगी. संसार चालविण्यासाठी शेतीकाम व मजुरीशिवाय पर्याय नाही. दोघा मुलांपैकी संदीपने (वय २३) बीए पूर्ण करून मेकॅनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले तर आकाश (वय २१) बीएच्या दुसऱ्या वर्षाला आहे.

आई-वडिलांचे कष्ट आणि राबणारे हात पाहून दोघा भावंडांनी स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी दोघा भावांनी स्टॉफ सिलेक्शनमार्फत निघालेल्या सीआरपीएफ दलाच्या भरतीसाठी अर्ज भरला. गत फेब्रुवारीत लेखी परिक्षा झाली. त्यात दोघेही उत्तीर्ण झाले. पुढचा टप्पा मैदानी परीक्षांचा होता. त्यातही त्यांनी बाजी मारली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sandeep and Akash Tiramali selected in the Central Reserve Police Force jalgaon success story news
Success Story : दिव्यांग आई-वडिलांच्या मुलासह सुनेचीही गरुड झेप

तर जून, जुलैमध्ये पुण्यात वैद्यकीय चाचणी झाली. या परीक्षेचा निकाल गत रविवारी जाहीर झाला आणि त्यात संदीप आणि आकाश यांची सीआरपीएफ पोलिस दलात नियुक्ती झाल्याचा निकाल लागला. दोघे सख्ख्या भावांची केंद्रिय राखीव पोलिस दलात नियुक्ती झाल्याचे वरखेडेसह परिसरातील हे पहिलेच भावंडे ठरले आहेत. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी जिद्द आणि चिकाटी व मेहनतीच्या जोरावर परीक्षांना तोंड दिले तर यश नक्कीच मिळते, हे वरखेड्याच्या दोघा भावंडांनी दाखवून दिले. त्यासाठी त्यांना मेहुणबारे येथील स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन करणारे सह्याद्री फाउंडेशनचे संचालक अमोल जाधव आणि मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस सतीष गवारे यांचे योगदान लाभले.

Sandeep and Akash Tiramali selected in the Central Reserve Police Force jalgaon success story news
Success Story: ‘दीड जीबी’मुळे वाटोळे नाही तर मी घडलो; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वी निहाल कोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()