Chandrayaan 3 : इस्रोच्या शुक्रवारी लाँच झालेल्या चांद्रयान-३ मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील हातेड या छोट्याशा गावातून इस्रोपर्यंत पोचणारे संजय गुलाबचंद देसरडा यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरलेली आहे.
चांद्रयान-३ यशस्वी प्रक्षेपण झाले. या यानासाठी त्यांनी द्रवरूप इंधनावर काम केले. (Sanjay Desarda worked on liquid fuel for Chandrayaan 3 jalgaon news)
मूळ हातेड येथील राहणारे व चोपडा येथील वर्धमान जैन श्री संघाचे संघपती गुलाबचंद इंदरचंद देसरडा यांचे पुत्र संजय हे गेल्या २० वर्षांपासून इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते या मोहिमेसाठी कार्यरत होते. अवकाशात सोडल्या जाणाऱ्या तीन प्रकारचे यानासाठी इंधन अत्यंत महत्त्वाचा भाग असतो.
यानाचे पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि काल प्रक्षेपित झालेल्या यानात एलव्हीएम-३ मध्ये द्रव (लिक्विड) लागत असते. यात वरिष्ठ शास्त्र म्हणून इस्त्रोकडून जबाबदारी त्यांना देण्यात आलेली होती. यापूर्वी संजय देसरडा यांनी मंगळयान, चांद्रयान-२, चांद्रयान-३ याव्यतिरिक्त अनेक मोहिमेत महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावलेली आहे.
हातेड ते इस्त्रो हा प्रवास आपल्यासाठी अनुभवांनी भरलेला होता, असे संजय म्हणतात. संजय यांच्या परिवारात त्यांची पत्नी चित्रा या गृहिणी आहेत, तर मोठी कन्या ऊर्जा आणि लहान मुलगा आयुष हा बारावीमध्ये असून, तो देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शास्त्रज्ञ म्हणून आपले करिअर करणार, अशी त्याची इच्छा आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जैन फार्म फ्रेश फुड्सच्या करार शेतीचे प्रमुख गौतम देसरडा, प्लॅस्टिक पार्क येथील कस्टम विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोंगरमल देसरडा आणि जैन फूडपार्क येथे कार्यरत छगनमल देसरडा यांचे ते पुतणे असून, या त्यांच्या सहभागाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व कंपनीच्या विस्तारित कुटुंबातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
हातेड ते इस्त्रो खडतर प्रवास
संजय देसरडा यांचे शालेय शिक्षण हातेडच्या सरकारी शाळेत झाले. नंतर त्यांना अभियांत्रिकीमध्ये अधिक रस असल्याने फैजपूरच्या जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले.
ते गेट परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयआयटी वाराणसी म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी येथून एमटेक पदव्युत्तर शिक्षण घेत असताना २००३ मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी इस्रोचे कमिटी आली व त्यात संजय यांची निवड झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.