Sanjay Raut News: गद्दार गेले, 10 आमदार निवडून आणू! : संजय राऊत

Mayor Jayashree Mahajan while gifting a sword to Shiv Sena chief Uddhav Thackeray on Sunday.
Mayor Jayashree Mahajan while gifting a sword to Shiv Sena chief Uddhav Thackeray on Sunday.esakal
Updated on

Sanjay Raut News : जिल्ह्यात शिवसेनतील चार आमदार गेले आहेत, ते गद्दार आहेत. परंतु येत्या निवडणुकीत आम्ही दहा आमदार निवडून आणू, असा विश्‍वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (ता. १०) येथे व्यक्त केला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे येथील मानराज पार्क मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. (Sanjay Raut statements traitors gone we will elect 10 MLAs at jalgaon shivsena thackeray group political)

‘जिल्ह्यातील चार आमदार शिवसेना सोडून गेले, असे म्हटले जात आहे. परंतु आजच्या सभेला असलेली गर्दी पाहिली, तर आजही शिवसेना उद्धव ठाकरेंसोबतच आहे हे पुन्हा एकदा दिसून आले.

जे सोडून गेले, त्यांना आजच्या गर्दीने धडकी भरणार आहे. चार आमदार सोडून गेले, तरी आम्ही त्यांच्या बदल्यात दहा आमदार निवडून आणू, या गद्दारांना जनताच धडा शिकवेल, असा विश्‍वासही श्री. राऊत यांनी व्यक्त केला.

धरणगावात शिवाजी महाराजांचा मुक्काम

जळगाव जिल्हा ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, असे सांगून राऊत म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे निघाले होते, त्या वेळी खानदेशात धरणगाव येथे सांडवेश्‍वराच्या मंदिरात मुक्कामी होते.

त्यांच्याजवळ जी तलवार होती, ती आज ते शिवसेनेला देऊन गेले आहेत, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही तिचा वापर करणार आहोत. त्याच बळावर आम्ही आगामी महापालिका, लोकसभा विधानसभा निवडणुका लढणार आहोत आणि जिंकणारही आहोत.

धरगावातच दहा दिवसांनंतर पाणी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, की पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याच धरणगावात दहा दहा दिवस पाणी येत नाही.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या पाणीयोजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही परिवर्तन होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mayor Jayashree Mahajan while gifting a sword to Shiv Sena chief Uddhav Thackeray on Sunday.
Sanjay Raut: "छत्रपती शिवराय जाताना त्यांची तलवार शिवसेनेला देऊन गेले"; संजय राऊतांचे जळगावात वक्तव्य

आम्ही विकास पेरला : जयश्री महाजन

महापौर जयश्री महाजन यांनी आपल्या आक्रमक भाषणात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, की विरोधी पक्षांनी महापालिकेत सत्तेवर असताना विकासकामे केली नाहीत.

परंतु आम्ही सत्तेवर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. ती सुरू आहेत, आमची टर्म संपली आहे. पण आमची विकासकामे जनतेला दिसून येतीलच.

जनतेला हवे तेच केले : कुलभूषण पाटील

उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले, की महापालिकेवर भाजपची अडीच वर्षे सत्ता होती. सत्ता दिल्यावर शंभर दिवसांत विकास करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. परंतु त्यांनी कोणताही विकास केला नाही. विकासापासून जनता वंचित राहिली.

त्यामुळे आम्ही त्यांची सोबत सोडून शिवसेनेची सत्ता महापालिकेवर स्थापन केली. आता जळगावचा विकास सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराज, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न केला.

परंतु त्याचे अनावरण होऊ न देण्यासाठी विरोधकांनी अडथळा आणला. मात्र आम्ही तो मोडून काढून कार्यक्रम केला.

सकल मराठा समाजातर्फे सत्कार

उद्धव ठाकरे यांचा सकल मराठा समाजातर्फे शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डी. डी. बच्छाव, प्रतिभा शिंदे, राम पवार आदी उपस्थित होते.

आयुक्तांना कायदा दाखवू : दानवे

सरदार वल्लभभाई पटेल व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरणास विरोध झाला. या वेळी राजशिष्टाचाराबाबत आयुक्तांनी मुंबई येथे पत्र देऊन माहिती मागविली होती, त्यानंतर शासनाने अनावरणास स्थगिती दिली.

त्यामुळे वाद निर्माण झाला. याबाबत दानवे म्हणाले, की आयुक्तांना राजशिष्टाचाराच कायदा व नियम काय असतो, हे आता उद्याच (ता. ११) दाखवून देवू.

Mayor Jayashree Mahajan while gifting a sword to Shiv Sena chief Uddhav Thackeray on Sunday.
Sanjay Raut: निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रासह देशात दंगली होतील; संजय राऊत यांचा पुनरुच्चार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.