Jalgaon News : भारत सरकार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचा ‘सर्वोच्च संस्था’ राष्ट्रीय पुरस्कार दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलला नुकताच जाहीर झाला आहे.
३ डिसेंबर रोजी दिल्लीत हा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरीत होणार आहे. (Sarvoch Sanstha National Award was announced to Deepstambh Foundation Manobal jalgaon news)
मनोबल हा प्रकल्प देशातील पहिला प्रकल्प आहे, ज्या मध्ये १८ वर्षावरील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना विनामूल्य निवासी सर्व प्रकारचे उच्च शिक्षण व त्यासाठी आवश्यक स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जाते.
सर्व प्रकारच्या दिव्यांगांसोबतच सर्व समावेशित शिक्षणासाठी आवश्यक वातावरण निर्माण होण्यासाठी दिव्यांगांसोबतच १८ वर्षांवरील अनाथ, आदिवासी ग्रामीण, ट्रान्सजेंडर विद्यार्थी, विद्यार्थिनींना सुद्धा एकत्र निवासी शिक्षण प्रशिक्षण या प्रकल्पात दिले जाते. या प्रकारचा हा देशातला पहिला आदर्श प्रकल्प मानून राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार संस्थेला या वर्षी जाहीर झाला आहे.
बारा राज्यांमध्ये कार्य
मनोबल प्रकल्पात जळगाव व पुणे येथे १२ राज्यांमधील व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील ३८० विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण प्रशिक्षण घेतात, सोबतच देशभरातील सुमारे ५०० हुन अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण प्रशिक्षण दिले जाते. त्यासोबतच अफगाणिस्तान, भूतान, पाकिस्तान श्रीलंका येथील विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाते.
"संस्थेत कार्यरत सहकारी, देणगीदार व हितचिंतक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच या आधी कधीही न घडलेले कार्य संस्थेच्या माध्यमातून उभे राहीले आहे." - यजुर्वेंद्र महाजन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.