Jalgaon Gulabrao Patil : खानदेशची मुलूख मैदान तोफ तथा साथी गुलाबराव पाटील यांच्यावर बुधवारी (ता. २३) दुपारी तीनच्या सुमारास दहिवद गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुलाबरावांवर साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव असल्याने ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या गीताने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (Sathi Gulabrao Patil last rituals jalgaon news)
अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे मंगळवारी (ता. २२) निधन झाले. आज सकाळी सातला गुलाबराव पाटील यांचे पार्थिव साने गुरुजी शाळेच्या प्रांगणात मुखदर्शनासाठी ठेवण्यात आले.
या वेळी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, अर्बन बँक चेअरमन मोहन सातपुते, रिटा बाविस्कर, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टरवर त्यांचे पार्थिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, साने गुरुजी पुतळा, सुभाषबाबू पुतळा, हुतात्मा स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पैलाडमार्गे दहिवद येथे आणण्यात आले. त्या वेळी साने गुरुजींची गीते आणि प्रार्थना स्पीकरवर वाजविण्यात येत होते. दहिवद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा जयवंतराव यांनी अग्निडाग दिला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गुलाबराव पाटील राजकारणी तथा समाजकारणी होते. सर्वसामान्य शेतकरी, कामगार, सामान्य माणसांविषयी बांधिलकी, गरिबांविषयी कळवळा असणारा माणूस होता. वाईटला वाईट म्हणण्याचे धैर्य आणि चांगल्याला चांगले म्हणण्याचे औदार्य त्यांच्यात होते, अशा भावना अनेकांनी व्यक्त करून त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
या वेळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार नाना बोरस्ते, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार संभाजी पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, खानदेश शिक्षण मंडळ चेअरमन डॉ. अनिल शिंदे, बाजार समिती सभापती अशोक पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष अविनाश पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, शिवसेनेचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, धरणगावचे नगराध्यक्ष नीलेश चौधरी, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व क्षेत्रातील मान्यवर हजर होते. रणजित शिंदे, अनिल शिसोदे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.