Jalgaon News : मेळघाटाच्या धर्तीवर आता सातपुड्यात जंगल सफारी

तालुक्यात सातपुडा जंगल सफारीला मार्चपासून सुरवात होणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल.
Trainees and forest department officials present on the occasion of jungle safari.
Trainees and forest department officials present on the occasion of jungle safari.esakal
Updated on

रावेर : तालुक्यात सातपुडा जंगल सफारीला मार्चपासून सुरवात होणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. त्यामुळे पर्यटकांना जंगल भ्रमंतीचा आनंद घेता येणार आहे.

यासाठी पाल (ता. रावेर) येथे प्रादेशिक वन विभागातर्फे १०० गाइड्सना प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे आदिवासी युवकांना रोजगार मिळणार आहे. (Satpura Jungle Safari is going to start from March in taluka jalgaon news)

राज्यात चिखलदरा पर्यटनस्थळाप्रमाणेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट, सेमाडोह, शहानूर, नरनाळा, बोरी, धारगड, वसाली, सिपना गुगामल व अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या जंगल सफारीसह कोलकास येथील हत्ती सफारीला मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे.

त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला. असाच रोजगार आता पाल परिसरातील युवकांना मिळणार आहे. सध्या पाल वनक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, ससा, निलगाय, सांबर, चिंकारा, तडस.

लांडगा, कोल्हा, खोकड आदी प्राणी दिसत असून, युरोपातून येणारे स्थलांतरित पक्षी गारबर्डी धरणावर दाखल झाले आहेत. पाल, गारबर्डी व लोहारा प्रादेशिक वनक्षेत्रात २४ किलोमीटर जंगल सफारी ३१ मार्चला सुरू होण्याची शक्यता आहे.

यात या परिसरातील १०० तरुणांची सफारी गाईडसाठी कार्यशाळा घेऊन प्रशिक्षणासाठी प्रादेशिक वन विभागाने कंबर कसली. यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पाल येथील वन विभागाच्या सभागृहात नुकतीच तरुणांची कार्यशाळा घेण्यात आली.

Trainees and forest department officials present on the occasion of jungle safari.
Jalgaon News : 5 कोटींतून विशेष नवजात शिशू कक्ष सुरु

या वेळी वाईल्डलॅड्स कन्व्हर्शन फाउंडेशनचे संचालक अजिंक्य भांबरकर यांनी युवकांना मार्गदर्शन केले. वन क्षेत्रातील अनेक वरिष्ठ, पर्यावरणप्रेमी यांनी जंगल कसे पाहायचे याचे धडे दिले.

प्रत्येकदा तो अनुभव नवा असतो. थोड्या चुका झाल्या तर शेवटही ठरू शकतो. त्यामुळे आपण प्राण्यांच्या हद्दीत आहोत, याचे भान कदापि सुटता कामा नये. जंगलात वाघ दिसला तर जंगल सफारीचे सार्थक झाले, असे म्हटले जाते.

वाघ पाहायचा तर संयम हवा. त्याच्या पाऊलखुणा, त्याने खोडांवर मारलेले पंजे, ओरखडे, त्याची विष्ठा, तो आला आहे, याचे संकेत देणारी माकडे, गवे, रानकुत्री, सांबर, पक्षी ही सारी मंडळी तो येण्याआधीच अलर्ट देतात. हा सारा माहोल अनुभवणे म्हणजे जंगल सफारी आहे.

या वेळी प्रादेशिक वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्यासह वनरक्षक युवराज मराठे, वनरक्षक राजू बोंदल, दीपक रायसिंग, अरुणा ढेपळे, मुकेश तडवी, संजय राजपूत आदी उपस्थित होते.

Trainees and forest department officials present on the occasion of jungle safari.
Jalgaon Maratha Survey : मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील कुटुंबीयांचे सर्वेक्षण सुरूच राहणार

"जंगल सफारीमुळे सुविधा वाढल्याने पर्यटकांचा ओढा दरवर्षी वाढेल. यातून पर्यटन व्यवसायाला आर्थिक बळ आणि स्थानिकांना रोजगार निर्मितीला जंगल सफारी सुविधा पोषकच ठरणार आहे. सध्या तीन- चारचाकी वाहने सफारीसाठी तयार आहेत. जंगल सफारीतून स्थानिकांना पर्यटन हंगामातील आठ महिने खात्रीचे आर्थिक उत्पन्न व रोजगार मिळणार आहे."- अजय बावणे, वनक्षेत्रपाल, रावेर

आरक्षणाची व्यवस्था

जंगल सफारीला जाण्यापूर्वी प्रादेशिक वन विभागाने ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था व तेथे निवास व्यवस्थाही उपलब्ध केली आहे. यासाठी शासकीय अनुपम बंगला व अंजन या निवासस्थानाचे सुशोभीकरण व नूतनीकरण केले.

जंगल सफारीसाठी तीन जिप्सी राज्य सरकार देणार असून, तोपर्यंत गावातील खासगी वाहनांना प्राधान्य देण्यात येईल. कमीत कमी ५०० युवकांना रोजगार मिळावा, असा आराखडा वन विभागाने तयार केला आहे.

Trainees and forest department officials present on the occasion of jungle safari.
Jalgaon News : जिल्ह्यात शेतकरी ह‍ित, पायाभूत सुव‍िधांचे जाळे : पालकमंत्री पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.