Jalgaon : स्कूल चले हम..पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश, पुस्तके

school students
school studentsesakal
Updated on

भुसावळ (जि. जळगाव) : दोन वर्षानंतर कोरोनाचे (Corona) संकट ओसरल्यानंतर खऱ्या अर्थाने बुधवारपासून (ता. १५) शाळांमध्ये (Schools) किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये कमालीचा उत्साह अन् उत्सुकता आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पुस्तके व गणवेश देऊन स्वागत करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. (school opening after 2 years of corona Jalgaon News)

राज्य सरकारच्या आदेशानुसार नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात १३ जूनपासून झाली. मात्र, कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर पहिल्या दोन दिवसांत शाळा आणि वर्गखोल्यांची स्वच्छता केल्यानंतर खऱ्या अर्थाने शाळेची घंटा बुधवारी खणखणणार आहे. भुसावळ तालुक्यातील चार हजार ७३३ विद्यार्थ्यांसाठी २८ लाख ३९ हजार ८०० रूपयांचा निधी तालुकास्तरावर प्राप्त झाला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेत पालक संपर्क मेळाव्याचे आयोजित करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच पालिका शाळेत होणाऱ्या या मेळाव्यात पालकांशी हितगुज करण्यात येईल, तसेच वर्षभरातील उपक्रम, विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सूचना या वेळी सांगण्यात येतील. तसेच अन्य बाबींवर या मेळाव्यात चर्चा करण्यात येईल. विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर वातावरण प्रसन्न वाटण्यासाठी शाळेसह परिसराची स्वच्छता करण्यावर भर दिला जात आहे.

नियमांचे पालन करा

कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घ्यावी. शाळेचे सौंदर्यीकरण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या अनुषंगाने उद्‍बोधन आदींचे नियोजन करावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. कोरोना निर्देश आणि सूचनांचे काटेकोरपणे पालनही करावे लागणार आहे.

school students
Jalgaon : कौटुंबिक वादातून न्यायालयासमोर 2 गटांत ‘फ्री स्टाइल’

कोरोनामुळे प्रशासनाची सतर्कता

दोन वर्षानंतरही कोरोना नियंत्रणात असला तरी पुन्हा त्याचा उद्रेक न वाढण्यासाठी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांचे तापमानही मोजण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तके दिली जातील. शिवाय, नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह तालुक्यातील ६५ जिल्हा परिषद व पालिकेच्या शाळेत दोन दिवस सफाई अभियान राबविले जाईल.

school students
जळगाव : रावेर येथे पालिकेच्या नालेसफाईचा बोजवारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.