Jalgaon School Reopen : स्कूल चले हम...! पहिल्या दिवशी शाळांमध्ये किलबिलाट

school reopen
school reopenesakal
Updated on

Jalgaon School Reopen : उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर गुरुवार (ता. १५) पासून शाळा पुन्हा सुरू झाल्‍या. नव्या शालेय शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली. जिल्‍हाभरात सकाळी साडेसातला शाळांची घंटा वाजली. पहिल्याच दिवशी अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सव झाला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे विविध पद्धतीने स्वागत करण्यात आले.

शाळेचा पहिला दिवस असल्‍याने विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्‍ये उत्सुकता दिसली. सकाळी सर्वच मुलांनी लवकर उठून तयारी करून शाळेला हजेरी लावली. राष्ट्रगीत, प्रार्थना करून विद्यार्थी वर्गात बसले. दोन महिन्‍यांनी भेटलेल्‍या मित्रमैत्रीणींसोबत गप्पा व मजाही केली. (school reopen Students were welcomed in schools in various ways jalgaon news)

शाळांमध्‍ये प्रवेशोत्‍सव

सर्वच शाळांनी प्रवेशोत्‍सवाची तयारी केली होती. शाळेच्‍या आवारात प्रवेश झाल्‍यानंतर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पुष्‍पवृष्‍टी, प्रवेशद्वाराला फुगे लावून सजावट केली होती. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्‍वागत झाले. अनेक शाळांमध्‍ये मुलांना चॉकलेट, बिस्‍कीट व खाऊचे वाटप झाले. काही शाळांमध्‍ये शिरा वाटप करण्यात आला. यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसले.

कुठे हसू कुठे रडू

शाळा सुरू झाल्‍याने फुलांनी, चित्रांनी, फुग्यांनी सजवलेली शाळा, युनिफॉर्म घालून पाठीवर दप्तर घेऊन आई-बाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली, तर काही हिरमुसलेल्या चेहऱ्याने गप्प उभी असलेली मुले शाळेत दिसून आली. सारे काही नवीन असल्‍याने मुले कुतूहलाने बघत होती. हसत-खेळत असलेली मुले, रडणाऱ्या मुलांना समजावत असलेले शिक्षक, असे दृश्य शाळेच्या पहिल्या दिवशी बघायला मिळाले.

आर. आर. विद्यालय

ईस्‍ट खानदेश एज्‍युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालयात संस्‍थेचे उपाध्‍यक्ष दिलीप लाठी, सचिव मुकुंद लाठी, सदस्‍या आशिषा मुंदडा, प्रभारी मुख्‍याध्‍यापक यु. जी. जाधव यांनी मुलांना गुलाबपुष्‍प दिले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्‍या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्‍वरूपात पुस्तकांचा संच देण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

school reopen
School Opening: विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अविस्मरणीय! इंदिरानगर, पाथर्डी फाटा परिसरात जल्लोषात स्वागत

सु. ग. देवकर प्रायमरी स्‍कूल

शिक्षणप्रसारक मंडळ संचलित सु. ग. देवकर प्रायमरी स्‍कूलमध्‍ये ज्येष्ठ शिक्षिका सुषमा साळुंके, मीनाक्षी कळसकर यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. विद्यार्थ्यांचे चॉकलेट, फुगे, गुलाबपुष्‍प देऊन स्‍वागत केले. विद्यार्थ्यांसाठी ‘वेलकम स्‍कूल’, असा सेल्‍फी पॉईंट तयार केला होता.

खडके प्राथमिक शाळा

लेवा एज्‍युकेशन युनियन संचलित श्रीमती शां. ल. खडके प्राथमिक विद्यामंदिरात प्रवेशोत्‍सव झाला. पताका, फुगे, तोरण, रांगोळ्या काढल्या होत्या. मुख्‍याध्‍यापिका अंजना सुरवाडे, ज्‍येष्ठ शिक्षिका स्‍वाती फिरके यांनी विद्यार्थिनींचे औक्षण केले. पोषण आहारात शिरा देण्यात आला.

लाठी विद्यामंदिर

ईस्‍ट खानदेश एज्‍युकेशन सोसायटी संचलित भा. का. लाठी विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्‍वागत झाले. पताका, रांगोळी काढून शाळा सजविली होती. विद्यार्थ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते मोफत पाठ्यपुस्‍तकांचे वाटप करण्यात आले.

school reopen
NMC School Students Welcome: संवाद, निपुणता, लैंगिक शिक्षणाच्या उपक्रमाचा समावेश; डॉ. मिता चौधरी

रत्‍ना जैन प्राथमिक विद्यालय

दि पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्‍था संचलित सौ. रत्‍ना जैन प्राथमिक विद्यालयात मुख्‍याध्‍यापिका आशा साळुंखे यांनी सरस्‍वतीपूजन केले. नंतर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्‍प देऊन शाळेच्‍या परिसरात ढोलताशांच्‍या गजरात मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्‍तक व खाऊ देण्यात आला.

प्राथमिक हिंदी शाळा क्रमांक ५५

जळगाव महापालिकेच्‍या हिंदी शाळा क्रमांक ५५ मध्‍ये प्रवेशोत्‍सव झाला. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्‍तकांचे वाटप झाले.

प्राथमिक शाळा, महाबळ

क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विद्यालयात गुलाबपुष्प देऊन आणि औक्षण करून सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. मुलांना गोड पदार्थ, चॉकलेट देण्यात आले. मोफत पाठयपुस्तकवाटप करण्यात आली. मनोरंजक खेळ आणि गाणे घेऊन पहिला दिवस साजरा झाला.

school reopen
NMC School Opening: पहिल्याच दिवशी सेवेत ‘स्मार्ट’ क्लासरूम! 68 शाळांमध्ये प्रकल्प

बालनिकेतन विद्यामंदिर

प्रगती शिक्षणप्रसारक संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता वाणी विद्यालयात नर्सरी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्‍प व पाठ्यपुस्‍तक देवून स्‍वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पोहे व शिरा देण्यात आला.

न्‍यू इंग्लिश मीडियम स्‍कूल

न्‍यू इंग्लिश मीडियम स्‍कूल फुगे, फुले, रांगोळ्या, फुलांच्‍या माळांनी सजविली होती. आठवी ते दहावीच्‍या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. काही विद्यार्थी टाळ मृदंगाच्‍या गजरात सहभागी झाली होती.

school reopen
Dhule School Reopen : पुस्तकाच्या 4 भागांमुळे विद्यार्थ्यांचे दप्तर होईल वेटलेस; शिक्षकांकडून शाळेची स्वच्छता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.