CM Shinde Jalgaon Daura : अमळनेरला एसटी बससेवा कोलमडली; विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

Crowd of passengers at the bus stand due to sporadic ST bus trips
CM Shinde Jalgaon Daura : अमळनेरला एसटी बससेवा कोलमडली; विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल
Updated on

CM Shinde Jalgaon Daura : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जळगावला एसटीने जादा बसेस सोडल्याने शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. काही तास विद्यार्थी बसस्थानकावर ताटकळत उभे होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यासाठी विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांना जळगाव येथे आणण्यासाठी आदेश सुटले होते.

अधिकारी, पदाधिकारी यांना बस भरून आणण्यासाठी सक्ती करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे अमळनेर तालुक्यातून देखील २५ एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. (school students passengers suffered as ST released extra buses to Jalgaon for govt shasan aplya dari program jalgaon news)

त्यामुळे अमळनेर आगारातील बसफेऱ्यांवर परिणाम झाला. आगारात ६८ बस असून, २५ जळगाव दौऱ्यासाठी तर १० बस पंढरपूर यात्रेसाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्यात काही नादुरुस्त असल्याने आणखीच अडचण वाढली होती. ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शाळेत, महाविद्यालयात अमळनेरला येत असतात.

परंतु सकाळी काही ठिकाणी एसटी पोहोचलीच नाही. आणि काही ठिकाणी उशिरा एसटी पोहचल्याने मुले, मुली शाळेत जाऊ शकले नाहीत. काहींना उशिरा बस मिळाली. सर्वत्र हीच अडचण आल्याने मुलांमध्ये एसटीचा संप असल्याची अफवा पसरली होती. दुपारून मुले, मुली घरी पोहोचली नाहीत म्हणून पालकांना चिंता वाटत होती. काही पालक आपल्या पाल्याना शोधण्यासाठी अमळनेरला आले होते.

"मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी २५ जादा बसेस सोडल्या, काही बसेस नादुरुस्त होत्या, त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांना उशीर झाला. मात्र सर्व ग्रामीण भागात बस सोडल्या होत्या." - इम्रान खान पठाण, आगार व्यवस्थापक, अमळनेर

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

CM Shinde Jalgaon Daura : अमळनेरला एसटी बससेवा कोलमडली; विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल
CM Eknath Shinde : जळगाव शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आवाहन

"शासन आपल्या दारी’च्या नावाखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासाठी जबरदस्तीने बस पाठवून विद्यार्थी आणि शेतकरी यांचे मात्र हाल करण्यात आले, ही निषेधार्ह बाब आहे." - अनिल पाटील, आमदार, अमळनेर

पारोळ्यातून १५ बस

‘शासन आपल्या दारी’ योजनेंतर्गत जळगाव येथील कार्यक्रमासाठी पारोळा आगारातून तालुक्यातील १५ एसटी बस सोडण्यात आल्या. बससह २६ क्रूझर गाड्यांमधून सुमारे हजार लाभार्थी जळगावला रवाना झाले. या ताफ्यास आमदार चिमणराव पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

ग्रामीण भागातील नागरिकांना सकाळीच तहसील कार्यालयात बोलाविण्यात आले होते. आलेल्या लाभार्थ्यांना जेवण देऊन जळगावला रवाना करण्यात आले. याप्रसंगी धुळ्याचे शिवसेना महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, तसेच जिल्हाप्रमुख सतीश महाले विशेष उपस्थितीत होते.

या सर्व लाभार्थ्यांना जळगाव येथे पाठवण्यासाठी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, नायब तहसीलदार राहुल मुळीक, रवींद्र महाडिक, एस. पी. शिरसाट आर. बी. शिंदे, मंडळ अधिकारी निशिकांत माने, विठ्ठल वारकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे, मुख्याधिकारी ज्योती भगत, डॉ. योगेश साळुंखे, डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी तसेच बचत गटसेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

CM Shinde Jalgaon Daura : अमळनेरला एसटी बससेवा कोलमडली; विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल
CM Shinde in Jalgaon : बस, चारचाकी वाहनांनी शहर गजबजले; ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या अधिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()