Jalgaon News : 17 मजलीत होतेय भंगाराचे गोदाम; मनपाच्या जागांची मुक्त उधळण

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporationesakal
Updated on

जळगाव : ‘स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव, हिरवेगार जळगाव’ हे महापालिकेचे (Municipal Corporation) ब्रीद आहे. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असताना हे साकारण्याचे ध्येय होते, काही प्रमाणात त्यांनी साकारलेही त्यातील एक म्हणजे सतरा मजली इमारत होय! (scrap warehouse on 17th floor of municipal corporation jalgaon news)

परंतु, आता याच इमारतीच्या तळमजल्यावर अतिक्रमण विभागाने जप्त करून आणलेल्या भंगाराचे गोदाम करण्यात येत आहे.

महापालिकेच्या शहरातील अनेक जागा संस्थांना मुक्तपणे उधळण्यात येत आहे, परंतु, जागा नाही म्हणून याच सतरा मजलीचे आता विद्रूपीकरण करण्यात येत आहे. महापालिकेत असलेले सत्ताधारी सुरेशदादांचे नेतृत्व असल्याचे सांगत असतात, तेच आता हे काम करीत आहेत.

जळगाव महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या मागे असलेल्या जागेत आता अँगल उभारून बांधकाम करण्यात येत आहे. प्रथमदर्शनी ते वाहने पार्किंगसाठी जागा असेल असे वाटले, मात्र त्याची अधिक माहिती घेतली असता. त्या ठिकाणी भंगाराचे गोदाम करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली.

महापालिकेतर्फे शहरातील अतिक्रमण हटविताना जे साहित्य जप्त करून आणले जाते ते या गोदामामध्ये ठेवण्यात येणार आहे. म्हणजे एकदा हे साहित्य या गोदामामध्ये टाकले की त्याच ठिकाणी ते वर्षानूवर्षे पडून राहणार हे नक्की. त्या ठिकाणी कोणतीही साफसफाई करण्याचा प्रश्‍नच नाही, त्यामुळे सतरा मजली आज जी अत्यंत चांगली दिसत आहे, त्याचे विद्रूपीकरण होण्यास वेळ लागणार नाही.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

jalgaon municipal corporation
National Helpline : ज्येष्ठ नागरिकांचा ‘व्हेलेंटाईन डे’ ; राष्ट्रीय हेल्पलाइनचा उपक्रम

मनपाच्या जागांचे मुक्त वाटप

महापालिकेच्या अनेक जागा आहेत. त्याचे मुक्तहस्ते वाटप करण्यात येते परंतु, आज महापालिका आपल्यासाठी जागा नसल्याने सतरा मजली इमारतीच्या जागेत हे गोदाम उभारून त्याचे विद्रूपीकरण करीत आहेत.

महापालिकेचे हेच गोदाम अगोदर नटवर टॉकीजच्या मागे असलेल्या महापालिकेच्या शाळेत होते, ती जागा एका सामाजिक संस्थेला देण्यात आली, त्यानंतर बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या मागील बाजूस जागा करण्यात आली,

ती जागा एका संस्थेला मोकाट जनावरांचा गोठा करण्यासाठी देण्यात आली, आज त्या ठिकाणी गोठा तर नाहीच परंतु, त्या संस्थेला एकाला घरासाठी जागा दिली असून त्या ठिकाणी राहण्यासाठी वापर होत आहे.

शिवाजी नगरातील गेंदालाल मिल भागात मोठी जागा आहे, मात्र त्या ठिकाणी ठेवण्यात येत नाही, तसेच मेहरुण जुन्या टीबी हॉस्पिटल परिसरात जागा आहे, मात्र ती सुद्धा सामाजिक संस्थांना देण्यात आली आहे.

jalgaon municipal corporation
Msedcl Go Green : ‘गो-ग्रीन’मधून 20 लाखांची वार्षिक बचत; वीज ग्राहकांना सवलत

याशिवाय आता याच सामाजिक संस्थांचा डोळा बगिच्यातील जागांवर आहे, अनेक संस्था या जागांची मागणी करीत असून प्रत्येक महासभेत एक तरी जागा संस्थांना विविध कारणासाठी दिली जाते. महापालिकेच्या महासभेत नगरसेवक एकमताने त्या जागांना मंजुरी देत असतात.

गोदामासाठी जागा का नाही?

महापालिकेच्या जागा मुक्तपणे सामाजिक संस्थांना देण्यात येत आहे, मात्र त्याच महापालिकेने आपले भंगार साहित्य ठेवण्यासाठी जागा मिळत नाही, ही अत्यंत शोकांतिका आहे. त्यामुळेच की काय सतरा मजली इमारतीचे विद्रूपीकरण करून त्या ठिकाणी भंगारचे गोदाम उभारण्यात येत आहे. अशी शंका आता निर्माण होत आहे.

सत्ताधाऱ्यांकडून विद्रूपीकरण

महापालिका सतरा मजली इमारतीची जागा अत्यंत चांगली असताना त्या ठिकाणी भंगारचे गोदाम करण्याची कल्पना कुणाची? ज्या सुरेशदादांनी शहरासाठी चांगली प्रशासकीय इमारत बांधली आज सत्तेत असलेले त्याचेच वारस याच इमारतीचे विद्रूपीकरण करीत आहेत. शहरात महापालिकेच्या अनेक जागा आहेत, त्या ठिकाणी या साहित्याचे गोदाम करता येऊ शकते मग हीच जागा कशासाठी? असा प्रश्‍नही नागरिकांना पडला आहे.

jalgaon municipal corporation
Youth Festival : युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी आज अखेरचा दिवस; अशी करा नोंदणी..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.