Jalgaon News : आव्हाणे शिवारातील गिरणा नदीपात्रात सोमवारी (ता. १३) सायंकाळी सातच्या सुमारास वाळू भरणारे सात डंपर आणि पाच ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने धाड टाकून ताब्यात घेतले होते.
यातील पाच ट्रॅक्टर विना क्रमांकाचे असल्याने या वाहनांचे मालक कोण याचा शोध महसूल प्रशासनाकडून घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Search for owners of dumper tractor seized in sand theft continues Punitive action will be taken by Tehsildar Patil Jalgaon News)
जिल्ह्यातील वाळू ठेक्याची मुदत संपल्याने वाळूच्या चोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दरम्यान राज्य शासनाने वाळूचे नवीन धोरण जाहीर केले असून, डेपो पद्धत अंमलात आणली आहे. मात्र, डेपो पद्धतीच्या लिलावाकडेही एजन्सीनी पाठ फिरविल्याने यंदा वाळू घाटांचे लिलाव होऊ शकले नाहीत. याचाच फायदा वाळूमाफिया घेत असून, सर्रासपणे वाळूची चोरटी वाहतूक सुरू होती.
वाहने जमा करण्यासाठी कसरत
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना मिळालेल्या माहितीवरून महसूलच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सातला गिरणा नदीपात्रात वाळू भरण्याच्या प्रयत्नात असलेले सात डंपर आणि पाच ट्रॅक्टर जप्त केले. महसूलच्या पथकाने कारवाई करताच वाहनचालकांनी पळ काढल्याने ही वाहने जिल्हाधिकारी कार्यालयामागील आवारात आणण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असे आहेत सात डंपर
या कारवाईत डंपर (एमएच १९, सीवाय ८३८८), (एमएच १९, सीवाय ९९९२), (एमएच १९, सीवाय ६४५६), (एमएच १९, झेड ५४१७), (एमएच १९, सीवाय १६७९), (एमएच १९, सीवाय ३६३६), (एमएच १९, झेड ५१००) अशी सात वाहने असून ,पाच ट्रॅक्टर विनाक्रमांकाचे आहेत. चेसीस क्रमांकावरून उपप्रादेशिक परिवहन विभागाला या वाहनांची पडताळणीसाठी पत्र देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई सर्कल देवेंद्र चंदनकर, राहुल वाघ, तलाठी छाया कोळी, वाहनचालक मनोज कोळी यांनी केली. जप्त केलेल्या या वाहनांप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार नामेदव पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.