Jalgaon Cotton News : हंगाम संपला तरी कापसाला नाही उठाव; यंदा केवळ 7 लाख गाठींचे उत्पादन

जिल्ह्यात कापूस हंगाम केव्हाच संपला तरी शेतकऱ्यांच्या कापसाला अद्यापही मागणी नाही.
cotton
cottonesakal
Updated on

Jalgaon Cotton News : जिल्ह्यात कापूस हंगाम केव्हाच संपला तरी शेतकऱ्यांच्या कापसाला अद्यापही मागणी नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाला मागणी नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही. यंदा ‘सीसीआय’चे केंद्र सुरू होऊनही कापसाची आवक वाढलेली नाही. शासकीय कापूस खरेदी ७ हजार २० रुपयांनी होत आहे.

तर व्यापारी कापसाला पाच हजार ते ६ हजार ८०० चा दर देत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी, जिनिंग चालक, प्रेसिंग चालक, एक्सपोटर असलेली साखळी कापसाअभावी व कापसाला मिळालेल्या अल्प दरामुळे तुटली आहे. (season ends in jalgaon district still no demand for farmers cotton news)

२०२३ च्या पावसाळ्यात पावसाने जूनच्या शेवटी हजेरी लावली. जुलैला तो चांगला बरसला. मात्र ऑगस्टमध्ये पुन्हा मोठा ब्रेक दिल्याने कापसाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट झाली. त्यातही काही वेळा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा कापसाचा दर्जा खालावला. सुरवातीला सात ते नऊ हजारांपर्यंत भाव कापसाला मिळाला.

नंतर मात्र कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावरूनच मागणी कमी झाल्याने कापसाचा दर सहा ते साडेसहा हजारांपर्यंत खाली आला. डिसेंबरमध्ये ‘सीसीआय’ने कापूस खरेदी काही केंद्रावर सुरू केली असली तरी सात बाऱ्यावर नोंद.

पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्डची अट, सोबतच पेमेंट मिळण्यास उशीर आदी कारणांनी काही शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’ केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. ज्या शेतकऱ्याला गरज होती त्यांनी व्यापाऱ्यांना मिळेल त्या दरात कापूस विकला. सध्या व्यापारी पाच हजार ते ६८०० दर देत आहेत. तरीही कापसाची आवक अतिशय कमी आहे.

५० टक्के कापूस घरातच

चांगल्या दराअभावी अद्यापही शेतकऱ्यांनी ५० टक्के कापूस विकला नाही. किमान आठ ते नऊ हजारांचा दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. आठ ते नऊ हजार गाठी दररोज तयार होणारा कापूस बाजारात येतो आहे. प्रत्यक्षात पंधरा ते वीस हजार गाठी तयार होणारा कापूस बाजारात विक्रीस येणे गरजेचे आहे.

cotton
Jalgaon News : राष्ट्रवादीचे आरोप शिवसेना नगराध्यक्षांनी फेटाळले

उत्पादनात बारा लाख गाठींची घट

गतवर्षी आक्टोबर ते सप्टेंबर या कापूस वर्षात १९ लाख गाठी तयार करण्यात आल्या. यंदा आतापर्यंत केवळ सात लाख गाठींची निर्मिती झाली आहे. कापूस बाजारात येत नसल्याने कापसावर अवलंबून असलेली सर्वच प्रक्रीया बंद पडल्याचे चित्र आहे.

"कापसाअभावी यंदा केवळ सात लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांच्या चांगल्या कापसाला सहा हजार आठशेचा दर मिळत आहे. पन्नास टक्के कापूस बाजारात विक्रीस आलेला नाही. सरकीलाही यंदा मागणी नाही. कापसाची आवक वाढली तरच गाठींचे उत्पादन वाढेल."

- अनिल सोमाणी, संचालक, भडगाव खानदेश जिनिंग मिल ओनर्स असोसिएशन

"कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी नाही. मागणी नसल्याने जिनिंग चालक गाठींचे उत्पादन कमी प्रमाणात करतात. सोबतच कापसाची आवक घटली आहे. चांगल्या कापसाला सहा हजार आठशेचा दर देऊनही कापूस विक्रीस येत नाही. कापसाच्या खंडीचा दर चोपन्न हजार (दोन गाठी) आहे."- प्रदीप जैन, अध्यक्ष खानदेश जिनिंग मिल ओनर्स असोसिएशन

cotton
Jalgaon News : यंत्रणांच्या उदासीनतेने हायकोर्टाची ‘तारीख पे तारीख’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()