Jalgaon News : चोपड्यात दुकानाला भीषण आग; प्राण वाचवणारा मात्र काळाच्या पडद्याआड!

rahul textile shop fire acident
rahul textile shop fire acidentesakal
Updated on

चोपडा (जि. जळगाव ) : शहरातील बाजारपेठेतील मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग (Fire) लागली.

या आगीत एकाचा मृत्यू झाला व उर्वरित ६ जणांना या भीषण आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. (second third floor of Rahul Emporium textile shop caught fire due to a short circuit jalgaon news)

शहरातील मेनरोडवरील बाजारपेठेतील राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले.

आग लागल्याचे समजताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच चोपडा नगरपरिषदेचे अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे दिसताच पोलिसांनी वायरलेस यंत्रणेद्वारे कळवून यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगाव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या.

त्यानंतर तब्बल साडेचार तासांनी ही आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या भीषण आगीमुळे गौरव सुरेश जैन - राखेचा (वय ३०) या तरुणाचा मृत्यू झाला. उर्वरित ६ जणांना आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या वेळी शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजित सावळे, पोलिस कर्मचारी जितेंद्र सोनवणे, मधुकर पवार, नितीन कापडणे, शुभम पाटील, हेमंत कोळी, हर्षल पाटील आदींसह इतर पोलिस कर्मचारी यांनी तातडीने बचावकार्य राबविले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

rahul textile shop fire acident
Eknath Khadse :.... तर शहराला देवच वाचवेल : एकनाथ खडसे

त्याबरोबरच चोपडा नगरपरिषद अग्निशमन दलासह यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगाव येथील दलांनी आग विझविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या वेळी चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. शहरवासीयांनी सुद्धा यावेळी धाव घेत बचावकार्यात मदत केली.

शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, प्रवीण जैन, पत्रकार लतीष जैन, सचिन सोनवणे, चेतन कानडे, सौरभ नेवे, अमर बोहरा, अजय राजपूत, रवींद्र नेवे, मुक्तार सरदार, दीपक राखेचा, कमलेश जैन, सागर नेवे, चौधरी, शिवा पाटील आदींसह इतर शहरवासीयांनी बचावकार्यात मदत केली. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक राजेश पाटील, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, संचालक नेमीचंद जैन, माजी नगरसेवक राजेंद्र जैस्वाल आदी उपस्थित होते.

चोपडा पालिकेची ढिसाळ यंत्रणा

नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागावर या आगीच्या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अग्निशामक बंब तातडीने यावा म्हणून प्रयत्न करणाऱ्यांचे दूरध्वनीच संबंधित कर्मचारी उचलत नव्हते. अखेर थेट नगरपालिकेत मोटारसायकलने धाव घेतल्यानंतर पालिकेचा बंब आला. पण नवख्या कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडत होती.

rahul textile shop fire acident
Shiv Jayanti 2023 : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीमध्ये आता ‘महिलाराज’

नागरिकांच्या मदतीने अग्निशामक बंबातून पाणी मारणे चालू झाले. पण त्यामध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास गेल्यामुळे आगीने आणखीनच रौद्ररूप धारण केले होते. तथापि चोपड्याचे अग्निशमन दल अपूर्ण पडेल, हे लक्षात येताच पोलिसांनी वायरलेस यंत्रणेद्वारे कळवून यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगाव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या.

त्यानंतर तब्बल साडेचार तासांनी ही आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत भीषण आगीमुळे गौरव सुरेश राखेचा (जैन) (वय २७) या तरुणाचा मृत्यू झाला. नगरपालिका अग्निशमन विभाग अद्ययावत करण्याची गरज असल्याचे सांगून अनेकांनी संताप व्यक्त केला.

बाजारपेठ बंद

चोपडा शहरातील राहुल एम्पोरियम येथे शनिवारी रात्री दोनला भीषण आग लागून राखेचा यांचे संपूर्ण संसारिक साहित्य जळून

खाक झाले, तसेच दुकानाचे संचालक सुरेशचंद्र राखेचा यांचे मोठे सुपुत्र गौरव राखेचा (वय ३०) यांचे या घटनेत निधन झाले. या घटनेमुळे सर्व व्यापारी वर्गावर शोककळा पसरली असून, व्यापारी संघटनांतर्फे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

rahul textile shop fire acident
Jalgaon News : कंपनीतून तांब्याच्या तारांसह साहित्यांची चोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()