Jalgaon News : विद्यार्थ्यांनो आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जा : सचिव डॉ.पी.आर. चौधरी

बारावी, दहावी किंवा इतर कोणत्याही परिक्षा देतान आत्मविश्‍वासाने परिक्षा दिली तर यश मिळते.
Dr. P.R. Chaudhary
Dr. P.R. Chaudharyesakal
Updated on

Jalgaon News : स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने परिक्षांना सामोरे जावे. बारावी, दहावी किंवा इतर कोणत्याही परिक्षा देतान आत्मविश्‍वासाने परिक्षा दिली तर यश मिळते. या परिक्षा तुमची बौद्धिक क्षमता, शैक्षणीक आकलन क्षमता किती आहे त्याची तपासणी असते.

कोणतीही परिक्षा देण्यापूर्वी भरपूर अभ्यास केला, एका विषयाची किमान पाच पेपर सोडवून ते संबंधित शिक्षकांकडून तपासून घेतले, तर त्या विषयात आपण किती अजून अभ्यास करायला पाहिजे, याची माहिती होते. (Secretary Dr P R Chaudhary statement Students face exam with confidence jalgaon news)

त्याप्रमाणे अधिक अभ्यास करायला पाहिजे, तरच यश मिळते, अशी माहिती येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्थेचे सचिव डॉ. पी. आर. चौधरी यांनी ‘सकाळ’ला दिली. येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावी, १ मार्चपासून दहावीची नंतर पदवी व पदव्युत्तर परिक्षांना सुरु होतील. त्यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला पाहिजे, पालकांनी भूमिका काय असली पाहिजे ?

या विषयावर ते ‘सकाळ’ संवाद साधत होते. ते म्हणाले, की बारावी, दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा अभ्यास झाला असेल. त्यांनी आता परिक्षेपर्यंत संबंधित विषयाची सराव प्रश्‍नपत्रिका सोडवून त्यात आपण कोठे कमी पडतो याची माहिती घ्यावी.ज्या विषयात कमी असेल त्याचा कसून अभ्यास करावा.

आतापासून ते परिक्षेपर्यत अभ्यास एके अभ्यास केला तर अधिक मार्क्स पडतील. परिक्षेत कोणतेही टेन्शन न घेता पेपर सोडवावा. पालकांनीही बारावी, दहावीच्या विद्यार्थ्यांना अमुक एवढेच गुण टक्के मिळाले पाहिजे असा आग्रह करायला नको.

Dr. P.R. Chaudhary
Aditya Thackeray Jalgaon Daura : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर

विद्यार्थी त्याच्या क्षमतेप्रमाणे अभ्यास करतोच. विद्यार्थ्यांची क्षमता, आवड पालकांनी त्याच्या लहानपणापासून माहित असते. यामुळे त्याला त्याच्या आवडीचा विषय बारावी, दहावीनंतर घेण्यास सांगावी.

वाटल्यास या परिक्षांपूर्वी पाल्याची आय.क्यू.टेस्ट करून घ्यावी. त्यात त्याचा कल दिसून येतो. त्याच्या आवडीप्रमाणे पुढील अभ्यासक्रम निवडून दिल्याचा तोही आनंदाने त्या विषयात प्रगती करतो. आणि पालकांचे त्यावर केलेला खर्च, श्रम वाया जात नाही. पाल्यास कमी मार्क पडल्याने, पालकांनी पाल्याला रागावू नये.

अन्यथा ते इतर मार्गाकडे वळतील. त्याची आवड लक्षात घेऊन त्याला पुढील शिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांनी जीवनातील कोणत्याही परिक्षांना आत्मविश्‍वासाने, जिद्दीने, मेहनतीने सामोरे जावे, यश तुमचे तुमच्या हातात असते.

Dr. P.R. Chaudhary
Jalgaon News : जळगाव जिल्ह्याला आदिवासी विकासासाठी 10 कोटींपेक्षा अधिकचा वाढीव निधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.