Jalgaon Crime News : MIDC पोलिस ठाण्यासमोरच सुरक्षारक्षकाला जाळले?

Jalgaon: Police personnel carrying the burnt body found in front of the police station in the industrial estate area
Jalgaon: Police personnel carrying the burnt body found in front of the police station in the industrial estate areaesakal
Updated on

जळगाव : औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यासमोरच बंदावस्थेतील ‘विक्रम प्लॅस्टिक’ या कारखान्यात ६६ वर्षीय वृद्धाचा डोक्यापासून कंबरेपर्यंत नुकताच जळालेला मृतदेह आढळून आला. सकाळी आठच्या ड्यूटीवर आलेल्या सुरक्षारक्षकास मृतदेह दिसताच त्याने ठेकेदार व नंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीतच रामनगरात ईश्वर देवराम अहिरे (वय ६६) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. तुलसी पाइप कंपनीच्या मालकांच्या बंगल्यावर रात्रीचे सुरक्षारक्षक (नाइट वॉचमन) म्हणून कार्यरत होते.

औद्योगिक वसाहतीतील पोलिस ठाण्यासमोरच अनेक वर्षांपासून बंदावस्थेत असलेल्या ‘विक्रम प्लॅस्टिक’ कंपनीत त्यांचे येणे-जाणे होते. पगार घेतल्यापासून ते नाइट वॉचमन म्हणून बंगल्यावर जात नसल्याने विक्रम प्लॅस्टिक कंपनीत आरामाला येत होते. (Security guard burnt in front of MIDC police station body becomes coal Accident suicide or accident Investigation team is on fast work jalgaon news )

Jalgaon: Police personnel carrying the burnt body found in front of the police station in the industrial estate area
Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

ड्यूटीवरील सुरक्षारक्षक थक्क

गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेआठच्या सुमारास या कंपनीतील नेहमीचे सुरक्षारक्षक काशीनाथ मराठे (वय ७०) नेहमीप्रमाणे ड्यूटीवर आले.

कंपनीच्या आवारातील तोडलेल्या झुडपांच्या काडीकचऱ्याला आग लागल्याचे त्यांना दिसल्याने काय घडले म्हणून पाहण्यासाठी मराठे यांनी जवळ जाऊन बघताच तेथे डोक्यापासून गुडघ्यापर्यंत जळून कोळसा झालेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

त्यांनी तत्काळ ठेकेदार शुभम लालसिंग ठाकूर व एमआयडीसी पोलिसांना घटना कळविली.

पोलिसांची धाव

घटनेची माहिती कळताच अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक संदीप गावित, निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक आनंदसिग पाटील, डीबी व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Jalgaon: Police personnel carrying the burnt body found in front of the police station in the industrial estate area
Gautam Adani News : आधी वीज, मग गॅस, आता गौतम अदानी पोहोचवणार प्रत्येक घरात...

बुटावरून पटली ओळख

सरपणावर जळालेल्या मृतदेहाच्या पायात अर्धवट जळालेला रबरी बूट, जवळ पडलेले सिगारेटचे पाकीट, अर्धवट जळालेल्या सिगारेटच्या धुटूकावरून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. हा मृतदेह ईश्वर देवराम अहिरे यांचे असल्याचे स्पष्ट हेाताच त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली.

घटनास्थळी आढळले डिझेलच्या कॅनचे बूच

बंद पडलेल्या विक्रम प्लॅस्टिक कंपनीत सहसा कुणाचीही ये-जा नसते. सुरक्षारक्षकही गेटवरच बसून असतात. ईश्वर अहिरे यांचा जळालेला मृतदेह आढळला, त्याच जागेवर डिझेलच्या कॅनचे बूच, अर्धवट जळालेली सिगारेट व सिगारेटचे पाकीट आढळून आले, तर आवारात दारूच्या बॉटल्याही सापडल्या.

ईश्वर अहिरे यांना दारूचे व्यसन होते. नैराश्यातून त्यांनी आग करून आत्महत्या केली की शेकोटी पेटविताना तोल जाऊन ते जाळात ओढले गेले किंवा त्यांना जळत्या झुडपांवर टाकून घातपात करण्यात आला आदी प्रश्नांची उत्तरे तपासात निष्पन्न होणार असून, प्रथमदर्शनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर सुरक्षारक्षक म्हणून पुरवठा करणारा ठेकेदार शुभम लालसिंग ठाकूर (वय ३०) यांच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

कुटुंबात आत्महत्येचे सत्र

मृत ईश्वर अहिरे यांच्या कुटुंबात यापूर्वीही आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्या पत्नीने पूर्वी जाळून घेऊन आत्महत्या केली होती, तर काही दिवसांपूर्वीच त्याच्या नातवाने गळफास घेतला. त्यानंतर एका नातेवाइकाचा मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावर परिचितांनी पोलिसांना दिली.

Jalgaon: Police personnel carrying the burnt body found in front of the police station in the industrial estate area
Municipal Corporation News : दरमहा सहा लाख खर्च, शौचालय साफसफाईची बोंबाबोब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.