Hatnur Dam : ‘हतनूर’वरील भूकंप मापक यंत्रणा बंद; ढिसाळ कारभाराने धरणाची सुरक्षा धोक्यात

Hatnur Dam
Hatnur Damesakal
Updated on

वरणगाव : दोन दिवसांपूर्वी तालुक्यात भूकंपाचे हादरे जाणवले. मात्र, धरण परिसरात भूकंपाच्या तीव्रतेची नोंद घेणारी यंत्रणा बंद आहे. पर्यायी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने धरणाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. परिणामी नवीन यंत्रणेची मागणी होत आहे.

Hatnur Dam
Breaking News : जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये दहशत

भुसावळ तालुक्यात सर्वत्र कमी जास्त भूकंपाचे कंपन जाणवल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर भूकंप मोजणी यंत्राचा विषय समोर आला असता तापी पूर्णा नदीवर हतनूर गावी १९८२ मध्ये ४१ दरवाजे असलेल्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. धरणाची उंची २५.५ मीटर म्हणजे ८४ फूट तर लांबी २५८० मीटर म्हणजेच ८४६० फूट एवढि आहे. धरणात पाणी साठविण्याची क्षमता १३.८ टीएमसीमध्ये १३८०० दशलक्ष घनफूट इतकी आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त जलसाठा असणाऱ्या धरणाच्या यादीमध्ये हतनूर धरणाचा १६ वा क्रमांक लागतो. पाणलोट क्षेत्रातील तज्ज्ञाच्या मार्गदर्शनुसार धरणे किंवा पाणी रोखून ठेवण्यासारख्या ठिकाणी पाण्याचा अतिरिक्त दाब असतो त्या अनुषंगाने परिसरात किंवा धरण ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता असते.

परिणामी अशा ठिकाणी भूकंप मोजणी यंत्रणा कार्यान्वित केली जाते. हतनूर धरण परिसरात धरण निर्मितीनंतर भूकंप मोजणी यंत्रणेसाठी लाखो रुपये खर्च करून इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यात भूकंपाची तीव्रता व मोजमाप व्यवस्थेसह विविध यंत्रसामूग्री कार्यान्वित करण्यात आली होते. मात्र जिल्ह्यात धरण निर्मितीनंतर भूकंपासारख्या घटना घडल्या नाही.

Hatnur Dam
Hatnur Dam : हतनूर धरणात गाळाचे साम्राज्य; क्षमतेच्या 50 टक्के गाळ

मात्र यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नाशिक मेरी येथे खूप दिवसांपासून पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. यंत्रणेकरिता बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीचे सुध्दा पडझड होऊन नुकसान झाले आहे. या ठिकाणी देखभालीसाठी साधा कर्मचारी देखील नाही. मात्र भविष्यात अशी अप्रिय घटना घडू नये, घडल्यास भूकंपांची तीव्रता मोजण्यासाठी आधुनिक यंत्रणेची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.