Jalgaon News: महापालिकेतर्फे 193 घरपट्टी थकबाकीदारांना जप्ती नोटीस; होणार धडक कारवाई'

arrears
arrearssakal
Updated on

Jalgaon News: महापालिकेतर्फे घरपट्टी थकबाकी न भरणाऱ्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. आज १९३ थकबाकीदारांना जप्तीची अंतिम नोटीस बजावण्यात आली असून एकूण ५१५ जणांवर पुढील महिन्यात ही कारवाई करण्यात येणार आहे.

शहरात महापालिकेतर्फे घरपट्टी विभागातर्फे थकबाकीदाराकडील वसुली जोरदारपणे राबविण्यात येत आहे. (seize notice to 193 house rent arrears by Municipal Corporation jalgaon news)

मात्र जे थकबाकीदार नोटीस बजावून व सवलत देवूनही थकबाकी भरत नाही, त्यांच्यावर धडक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. महापालिकेने अशा थकबाकीदारांची यादी तयार केली आहे.

त्यात एकूण ५१५ थकबाकीदार असल्याचे आढळून आले आहे. या थकबाकीदारांची मालमत्ता थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी अंतिम नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ३७९ जणांना अंतिम नोटीस महापालिकेने बजावली आहे.

त्यांना घरपट्टी भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली असून जर ही नोटीस मुदतीपर्यंत घरपट्टीची थकबाकी भरली नाही, तर त्यांच्यावर जप्ती करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

arrears
Medical Courses Admission: ‘सीईटी-सेल’च्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत घोळात घोळ; विद्यार्थ्यांची दमछाक

आता आणखी पुन्हा १९३ जणांना आज अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना थकबाकी भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात जप्ती

अंतिम नोटीस बजावण्यात आलेल्या ५१५ जणांपैकी जे घरपट्टी भरतील त्यांना वगळून जे घरपट्टी भरणार नाहीत त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. पुढील डिसेंबर महिन्यापासून ही कारवाई सुरू करण्यात येणार आहे. घरांची जप्ती करून महापालिकेतर्फे थेट लिलाव करण्यात येईल. लिलावात कोणीही बोली लावली नाही तर त्या मिळकतीवर महापालिकेचे नाव लावण्यात येणार आहे.

"महापालिकेतर्फे ३२२ जणांना अगोदर जप्तीची अंतिम नोटीस पाठविण्यात आली आहे. आज १९३ जणांना अंतिम नोटीस पाठविण्यात आली आहे. असे एकूण ५१५ जणांवर जप्तीची कारवाई पुढील महिन्यापासून करण्यात येणार आहे." - नरेंद्र चौधरी, कर अधीक्षक महापालिका, जळगाव

arrears
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात मृतांच्या नावाने ‘शस्त्र परवाने’; शस्त्र न घेतलेल्या 45 जणांचे परवाने रद्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()